रॉबर्ट वड्रा यांच्याशी संबंधित कंपनीला 'ईडी'कडून नवी नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2016 20:56 IST2016-07-01T20:46:48+5:302016-07-01T20:56:21+5:30
सक्तवसुली संचालनालयाने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्याशी संबंधित एका कंपनीला नवी नोटीस पाठविली आहे.

रॉबर्ट वड्रा यांच्याशी संबंधित कंपनीला 'ईडी'कडून नवी नोटीस
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ : राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील एका जमीन व्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्याशी संबंधित एका कंपनीला नवी नोटीस पाठविली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दस्तऐवज सादर करण्यासाठी दुसऱ्यांदा समन्स जारी करण्यात आले आहेत. स्कायलाईट हॉस्पिटीलिटी या कंपनीला दस्तऐवज सादर करण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी देण्यात आला आहे.
बिकानेर जिल्ह्यात आणि अन्य ठिकाणी ईडीकडून गत महिन्यात तपासात महत्त्वाचे दस्तऐवज जप्त केल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यानंतर ही नोटीस जारी करण्यात आली आहे. बिकानेरजवळ कंपनीकडून कथितरीत्या खरेदी करण्यात आलेल्या जमिनीशी संबंधित हे प्रकरण आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या मूळ तक्रारीत ईडीने वड्रा किंवा त्यांच्याशी संबंधित कंपनीच्या नावाचा उल्लेख केलेला नाही.