नवे राष्ट्रीय सहकार धोरण केंद्राला सादर; सुरेश प्रभूंनी घेतली अमित शाहांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 05:53 AM2023-10-20T05:53:04+5:302023-10-20T05:53:32+5:30

सहकार क्षेत्रात सुशासन तसेच निर्णयांची अंमलबजावणी करण्यावर या अहवालात भर देण्यात आला आहे.

New National Cooperative Policy Submitted to Center; Suresh Prabhu met Amit Shah | नवे राष्ट्रीय सहकार धोरण केंद्राला सादर; सुरेश प्रभूंनी घेतली अमित शाहांची भेट

नवे राष्ट्रीय सहकार धोरण केंद्राला सादर; सुरेश प्रभूंनी घेतली अमित शाहांची भेट

- सुनील चावके

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सहकार क्षेत्राला बळकटी आणून आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तसेच समान संधी देणारे नवे राष्ट्रीय सहकार धोरण - २०२३ बुधवारी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केंद्रीय गृह व सहकारी मंत्री अमित शाह यांना सादर केले. 

सहकार क्षेत्रात सुशासन तसेच निर्णयांची अंमलबजावणी करण्यावर या अहवालात भर देण्यात आला आहे. भारतात पत, कृषी प्रक्रिया, पणन, दुग्ध व्यवसाय, विणकर, मस्त्यपालन, गृहनिर्माण अशा विविध क्षेत्रांमध्ये सुमारे २९ कोटी सभासद असलेल्या साडेआठ लाख सहकारी समित्या कार्यरत आहेत. 

४७ सदस्यांची होती समिती
अमित शाह यांनी नवे सहकार धोरण तयार करण्यासाठी सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ आणि प्रतिनिधींचा समावेश असलेली ४७ सदस्यांची समिती स्थापन केली होती. 
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असलेले माजी मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. यापूर्वीचे सहकार धोरण २००२ साली तयार करण्यात आले होते. 

Web Title: New National Cooperative Policy Submitted to Center; Suresh Prabhu met Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.