नवा मुंबई पट्टा
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:13+5:302015-02-18T00:13:13+5:30
कोपरखैरणेत ६ लाखांची चोरी

नवा मुंबई पट्टा
क परखैरणेत ६ लाखांची चोरीनवी मुंबई: शिवाजी नगर बोनकोडे परिसरात चोरीची घटना घडली. घराच्या उघड्या दरवाजा वाटे आत शिरुन ६,६०,५०० रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने पळवून नेले. या संदर्भात पांडुरंग साठे यांनी कोपरखैरणे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.बॅग पळविलीनवी मुंबई: एपीएमसी सेक्टर-१९ मधील रस्त्यावरुन चालत असताना अज्ञातांनी बॅग पळवून नेली. मोटरसायकलवरुन जाणा-या दोन अज्ञातांनी पंकज गिरी यांच्या हातातली बॅक हिसकावून घेतली. या बॅगमध्ये ३,२०,०० रुपयांची रोख रक्कम होती. या प्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.एनआरआय परिसरात घरफोडीनवी मुंबई: तरघर परिसरात घरफोडीची घटना घडली. बंद घराच्या खिडकीचे ग्रील तोडून चोरट्यांनी घरातल्या वस्तू पळवून नेल्या. यात मोबाईल टॅब, पैसे असा एकुण २३,००० रुपये किमतीच्या वस्तू चोरून नेल्या. या प्रकरणी विजयकुमार महतो यांनी एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.ट्रेलर पळवलानवी मुंबई: द्रोणागिरी परिसरात उभ्या केलेल्या ट्रेलरची चोरी झाल्याची घटना घडली. पांढ-या रंगाचा पीबी-०५-एन-७१३७ हा ट्रेलर चोरट्यांनी पळवून नेला. या संदर्भात राधा सिंग यांनी उरण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.कोमोठ्यात घरफोडीनवी मुंबई: कोमोठे सेक्टर-२४ मध्ये चोरीची घटना घडली. सोमवारी दिवसभरात चोराट्यानी खिडकीद्वारे आत शिरुन ८०,००० रुपयांची रोख रक्कम पळवून नेली. या संदर्भात सचिन जाधव यांनी कोमोठे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.कारमधील वस्तूंची चोरीनवी मुंबई: सीबीडी सेक्टर-१५ मधील रस्त्यावर उभ्या केलेल्या कार मधील वस्तूंची चोरी झाल्याची घटना घडली. बुधवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान उभी केलेली एमएच-४३-९१८० या कार मधील लॅपटॉप, मोबाईल अशा एकुण ९४,००० किमतीच्या वस्तू अज्ञातांनी पळवून नेल्या. या प्रकरणी राम गवयाणी यांनी सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.