सोहेल महमूद पाकचे नवीन उच्चायुक्त

By Admin | Updated: May 9, 2017 00:46 IST2017-05-09T00:46:20+5:302017-05-09T00:46:20+5:30

भारतातील पाकिस्तानचे नवीन उच्चायुक्त म्हणून सोहेल महमूद यांची नियुक्त करण्यात आली असून शुक्रवारीच भारताने त्यांना व्हिसाही मंजूर केला आहे.

New High Commissioner to Sohail Mahmoud Pak | सोहेल महमूद पाकचे नवीन उच्चायुक्त

सोहेल महमूद पाकचे नवीन उच्चायुक्त

इस्लामाबाद : भारतातील पाकिस्तानचे नवीन उच्चायुक्त म्हणून सोहेल महमूद यांची नियुक्त करण्यात आली असून शुक्रवारीच भारताने त्यांना व्हिसाही मंजूर केला आहे.
सोहेल महमूद हे सध्या तुर्कीत पाकिस्तानचे राजदूत आहेत. ते नवीन पदाची सूत्रे मेअखेर किंवा जूनच्या सुरुवातीला घेण्याची शक्यता आहे. अब्दुल बासित यांचा भारतातील तीन वर्षांचा कार्यकाळ संपलेला असल्याने त्यांच्या जागी सोहेल महमूद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)

सीमापार दहशतवादी हल्ले, कुलभूषण जाधव यांना सुनावण्यात आलेला मृत्युदंड यासह विविध मुद्यांवरून भारत आणि पाकिस्तानदरम्यानचे संबंध तणावपूर्ण असताना सोहेल महमूद हे या पदाची सूत्रे हाती घेत आहेत.

Web Title: New High Commissioner to Sohail Mahmoud Pak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.