शहरं
Join us  
Trending Stories
1
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
2
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
3
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
4
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
5
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
6
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
7
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
8
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
9
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
10
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
11
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
12
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
13
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
14
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
15
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
16
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
17
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
18
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
19
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
20
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुका होणाऱ्या ९ राज्यांत नवे राज्यपाल, जाणून घ्या कुठे झाला बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 10:52 IST

अनेक ठिकाणी जनतेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न; बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग येणार

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्र सरकारने रविवारी १३ राज्यांतील राज्यपाल आणि नायब राज्यपाल बदलले आहेत. भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. त्यांच्या जागी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या १३ राज्यांमध्ये राज्यपाल आणि नायब राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यापैकी नऊ राज्यांमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत.

या नऊ राज्यांमध्ये खांदेपालट यंदा देशातील नऊ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्यापैकी त्रिपुरा, मेघालय, नागालँड आणि मिझोराम या चार ईशान्येकडील राज्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचवेळी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन मोठ्या हिंदी पट्ट्यातील राज्यांमध्ये नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार आहेत. कर्नाटक आणि तेलंगणामध्येही यंदा निवडणुका आहेत. बिहारमध्ये नवीन राज्यपाल नियुक्तीच्या घोषणेनंतर राजकीय हालचाली वाढल्या आहेत.

असे आहेत नवनियुक्त राज्यपाल

अब्दुल नजीर : अयोध्येतील ऐतिहासिक राममंदिराच्या निकालात सहभागसर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर यांना आंध्र प्रदेशचे राज्यपाल बनविण्यात आले आहे. ते ४ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले. अवघ्या ४० दिवसांतच ते राज्यपाल झाले. न्यायमूर्ती नझीर राममंदिरावर निकाल देणाऱ्या खंडपीठाचा भाग होते. त्यांनी मंदिराच्या बांधकामाच्या बाजूने निकाल दिला. ते तिहेरी तलाक आणि नोटाबंदीसारख्या प्रकरणांवर निर्णय घेणाऱ्या खंडपीठांमध्येही सामील होते.रमेश बैस : सातवेळा खासदारांकडे सोपविण्यात आली महाराष्ट्राची धुरा   रमेश बैस हे छत्तीसगड भाजपचे दिग्गज नेते आहेत. ते सलग सातवेळा खासदार राहिले आहेत. याआधी ते त्रिपुरा आणि झारखंडचे राज्यपाल राहिले आहेत. आता त्यांच्याकडे महाराष्ट्राची धुरा सोपविण्यात आली आहे. बैस यांनी हेमंत सोरेन सरकारचे झारखंड वित्त विधेयक २०२२मध्ये परत केले होते. त्याचवेळी हेमंत सोरेन यांच्या निवडीसंदर्भातील त्यांच्या वक्तव्यावरून बराच वाद झाला होता.

निवृत्त ब्रिगेडियर मिश्रा : लडाखमध्ये नियुक्तीनिवृत्त ब्रिगेडियर डॉ. बी.डी. मिश्रा यांना लडाखचे नायब राज्यपाल बनवण्यात आले आहे. याआधी ते अरुणाचल प्रदेश आणि मेघालयचे राज्यपाल होते. मिश्रा ३१ जुलै १९९५ रोजी लष्करातून निवृत्त झाले. ते एनएसजी (ब्लॅक कॅट कमांडो) काैंटर हायजॅक टास्क फोर्सचे कमांडर होते, ज्याने २४ एप्रिल १९९३ रोजी राजा सांसी एअरफील्ड, अमृतसर येथे अपहृत इंडियन एअरलाइन्सच्या विमानाची दहशतवाद्यांपासून सुटका केली. १९६२ चे भारत- चीन युद्ध, नागालँडमधील नागा बंडखोरांविरुद्ध १९६४, सियालकोटमध्ये पाकविरुद्ध (१९६५) प्रमुख भूमिका निभावली. 

अनुसया उईके : छत्तीसगडमधून उचलबांगडीभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या छत्तीसगड दौऱ्यानंतर एका दिवसानंतर राज्यपाल अनुसया उईके यांना हटवण्यात आले आहे. त्यांना मणिपूरचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या उईके यांची सरकारने १६ जुलै २०१९ रोजी छत्तीसगडच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती. बरोबर एक महिन्यानंतर छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या नव्या सरकारने काम सुरू केले. उईके यांनी आरक्षण दुरुस्ती विधेयकावर स्वाक्षरी करण्यासाठी मार्चची तारीख निश्चित केली होती.

एल.ए. गणेशन : नागालँडमध्ये राज्यपालमणिपूरचे राज्यपाल एल.ए. गणेशन यांना नागालँडचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. गणेशन यांनी १८ जुलै २०२२ ते १७ नोव्हेंबर २०२२ पर्यंत पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणूनही काम केले आहे. तामिळनाडूचे वरिष्ठ भाजप नेते गणेशन २०२२ च्या ड्युरंड कप फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर सुनील छेत्रीला स्टेजवर ट्रॉफीसह पोज देण्यासाठी ढकलताना दिसले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. 

फागू चौहान : चार पक्षांचा अनुभव, मेघालयचे राज्यपालबिहारचे ४० वे राज्यपाल बनलेले फागू  चौहान यांना आता मेघालयची जबाबदारी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या १७व्या विधानसभेच्या निवडणुकीत घोसी येथून सर्वाधिक मतांनी ते विजयी झाले होते. १९८५ मध्ये पहिल्यांदा दलित किसान मजदूर पक्षाचे आमदार झाले. १९९१ मध्ये जनता दलाचे आमदार निवडून आले. त्यानंतर १९९६ आणि २००२ मध्ये ते आमदार झाले. २००७ मध्ये त्यांनी बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक जिंकली. २०१७ ची विधानसभा निवडणूक भाजपकडून लढत आमदार झाले.

 

टॅग्स :Electionनिवडणूकbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीMaharashtraमहाराष्ट्रAmit Shahअमित शाह