संसद अधिवेशनापूर्वीच काश्मिरात नवे सरकार चर्चेची मालिका :भाजप- पीडीपीच्या वाटाघाटींना वेग

By Admin | Updated: February 13, 2015 23:10 IST2015-02-13T23:10:58+5:302015-02-13T23:10:58+5:30

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होत असून त्याआधी जम्मू-काश्मिरात भाजप- पीडीपी आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या आहेत. किमान समान कार्यक्रमासह वादाचे मुद्दे निकाली काढण्यासाठी पार पडलेल्या बैठकींच्या मालिकेतून सकारात्मक संकेत देण्यात आले.

New government talks in Kashmir ahead of Parliament session: BJP-PDP negotiations | संसद अधिवेशनापूर्वीच काश्मिरात नवे सरकार चर्चेची मालिका :भाजप- पीडीपीच्या वाटाघाटींना वेग

संसद अधिवेशनापूर्वीच काश्मिरात नवे सरकार चर्चेची मालिका :भाजप- पीडीपीच्या वाटाघाटींना वेग

ी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होत असून त्याआधी जम्मू-काश्मिरात भाजप- पीडीपी आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या आहेत. किमान समान कार्यक्रमासह वादाचे मुद्दे निकाली काढण्यासाठी पार पडलेल्या बैठकींच्या मालिकेतून सकारात्मक संकेत देण्यात आले.
किमान समान कार्यक्रमावर शिक्कामोर्तब करण्यासाठी दोन्ही पक्षांचे शिष्टमंडळ लवकरच दिल्लीत भेटणार असून जम्मू-काश्मीर सरकारच्या प्रशासनाची चौकट तयार केली जाईल, असे पीडीपीचे मुख्य प्रवक्ते नईम अख्तर यांनी सांगितले. जम्मू-काश्मीर भाजपचे अध्यक्ष जुगलकिशोर आणि प्रभारी अविनाश राय यांच्यासोबत भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी बैठकींची मालिका पार पाडली. जम्मू-काश्मीर भाजपच्या काही नेत्यांनी शुक्रवारी पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली.
----------------
कोट
सरकार स्थापण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण प्रगती होत आहे. रचनात्मक चर्चा लवकरच सुरू होण्याची मला आशा आहे. मतभेद निकाली काढले जात आहेत.
-नईम अख्तर
पीडीपीचे प्रवक्ते.

Web Title: New government talks in Kashmir ahead of Parliament session: BJP-PDP negotiations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.