शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शेतमाल खरेदीची नवी अन्नदाता संरक्षण योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 05:13 IST

आगामी निवडणुकांवर डोळा ठेवून केंद्र सरकारने बुधवारी मंदीच्या काळातही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला हमीभावाएवढी किंमत हमखास मिळवून देण्यासाठी ‘प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान’ (पीएम-आशा) नावाची योजना मंजूर केली.

नवी दिल्ली : आगामी निवडणुकांवर डोळा ठेवून केंद्र सरकारने बुधवारी मंदीच्या काळातही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला हमीभावाएवढी किंमत हमखास मिळवून देण्यासाठी ‘प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान’ (पीएम-आशा) नावाची योजना मंजूर केली.शेतकºयांना उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट हमीभाव देण्याचे व त्यायोगे शेतकºयांचे उत्पन्न सन २०२०पर्यंत दुप्पट करण्याच्या महत्वाकांक्षी वचनाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने हे ऐतिहासिक पाऊल असल्याचा दावा सरकारने केला. केंद्रीय मंत्रिमंडळाने शेतमाल खरेदीच्या या नव्या पद्धतीस मंजुरी देताना केंद्र सरकारकडून राज्यांना दिल्या जाणाºया हमी रकमेत १६,५५० कोटी रुपयांनी वाढ करण्याचाही निर्णय घेतला. शेतमाल खरेदीसाठीची अर्थसंकल्पीय तरतूदही वाढविण्यात आली असून या योजनेसाठी वेगळे १५ हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीनंतर केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंग यांनी सांगितले की, सरकार केवळ वाढीव हमीभावांची घोषणा करून थांबलेले नाही. तर त्यानुसार शेतकºयांना प्रत्यक्षात पैसे मिळतील याची खात्रीशीर व्यवस्था या नव्या निर्णयाने करण्यात आली आहे. शेतमालाच्या प्रत्यक्ष खरेदीवेळी प्रचलित बाजारभाव हमीभावापेक्षा कमी असेल तर वरची रक्कम सरकार देईल.

टॅग्स :Farmerशेतकरी