शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण क्षेत्रातील 10+2 पद्धत जाणार; 5+3+3+4 व्यवस्था येणार; जाणून घ्या नेमकं काय बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 19:27 IST

नव्या शैक्षणिक धोरणाला मोदी सरकारकडून मंजुरी; शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होणार

नवी दिल्ली: मोदी सरकारनं नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली आहे. तब्बल ३४ वर्षांनंतर देशात नवं शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. विद्यार्थी ज्ञानार्थी व्हावेत, त्यांनी केवळ परीक्षार्थी राहू नये, यासाठी शैक्षणिक धोरणात अतिशय महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. सध्या देशात १०+२ शिक्षण पद्धत लागू आहे. आता त्यात आमूलाग्र बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे १०+२ ची पद्धत जाऊन ५+३+३+४ अशी नवी व्यवस्था आकारास येईल.सध्याच्या घडीला देशात १०+२ पद्धत रुढ आहे. मात्र नव्या पद्धतीत बोर्ड परीक्षांचं महत्त्व कमी करण्यात आलं आहे. त्यामुळे १०+२ व्यवस्थेची जागा ५+३+३+४ घेईल. पहिल्या टप्प्यात पूर्व प्राथमिक ते दुसरी (५ वर्ष), दुसऱ्या टप्प्यात तिसरी ते पाचवी (३ वर्ष), तिसऱ्या टप्प्यात सहावी ते आठवी (३ वर्ष) आणि चौथ्या टप्प्यात नववी ते बारावी (४ वर्ष) अशी शैक्षणिक व्यवस्थेची नवी रचना असेल. सध्या दहावीनंतर विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य, विज्ञान अशा तीन शाखा उपलब्ध असतात. याच तीन शाखांचा विचार विद्यार्थ्यांकडून प्रामुख्यानं केला जातो. एका शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला दुसऱ्या शाखेतला एखादा विषय आवडत असेल, तर तो शिकता येत नाही. मात्र नव्या शैक्षणिक धोरणामुळे अशा प्रकारे दुसऱ्या शाखेचा, अभ्यासक्रमातला विषय शिकता येईल. त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल.नव्या शैक्षणिक धोरणाची ठळक वैशिष्ट्यं-- शिक्षकांसोबतच पालकांनादेखील जागरूक करण्यावर भर- प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमता वाढवण्यावर, प्रोत्साहन देण्यावर प्राधान्य- रचनात्मक विचार करण्यास प्रोत्साहन- नैतिकता, घटनात्मक मूल्यं अभ्यासक्रमाचा प्रमुख हिस्सा असतील.नव्या शैक्षणिक धोरणाची संस्थात्मक वैशिष्ट्यं- 2040 पर्यंत सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये अधिकाधिक विषय, अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याचं ध्येय- तीन हजार किंवा त्याहून अधिक विद्यार्थी असलेल्या शैक्षणिक संस्था तयार करण्यावर भर- २०३० पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात अनेक विषयांचं शिक्षण देणारी किमान एक संस्था असेल- सार्वजनिक संस्थांच्या विकासावर भर देणारा अभ्यासक्रम असेल- ओपन डिस्टन्स लर्निंग आणि ऑनलाईन एज्युकेशनचे पर्याय शैक्षणिक संस्थांकडे असतील.- उच्च शिक्षणासाठी उभारण्यात आलेली सर्व प्रकारची संलग्न विद्यापीठं आता विद्यापीठं म्हणूनच ओळखली जातील. - बौद्धिक, सामाजिक, शारीरिक, भावनात्मक आणि नैतिक क्षमतांचा विकास करण्याचं लक्ष्य

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र