नवी दिल्ली बनणार पहिली ‘स्मार्ट सिटी’
By Admin | Updated: January 4, 2015 02:41 IST2015-01-04T02:41:31+5:302015-01-04T02:41:31+5:30
दिल्ली हे एक वैश्विक शहर म्हणून विकसित केले जाणार असून, ते देशातले पहिले स्मार्ट शहर म्हणूनही ओळखले जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय नगरविकासमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी येथे केले

नवी दिल्ली बनणार पहिली ‘स्मार्ट सिटी’
नवी दिल्ली : दिल्ली हे एक वैश्विक शहर म्हणून विकसित केले जाणार असून, ते देशातले पहिले स्मार्ट शहर म्हणूनही ओळखले जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय नगरविकासमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी येथे केले. ‘आम्ही दिल्लीला खऱ्या अर्थाने वैश्विक शहर म्हणून विकसित करणार आहोत. ज्यात लंडन वा सॅन फ्रान्सिस्कोप्रमाणे सर्व अत्याधुनिक सोयीसुविधांसह, अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील मनोरंजनाची साधने व शैक्षणिक संस्था असतील. मोदी सरकारने देशात अशी १०० स्मार्ट शहरे विकसित करण्याचा निर्धार केला असून, यातील पहिले स्मार्ट शहर हे दिल्ली राहणार आहे, असे ते पुढे म्हणाले.