शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

'हॅलो! मला अटक करा, मी पत्नीची हत्या केलीय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 11:46 IST

''हॅलो साहेब ! मला अटक अटक करा, मी माझ्या पत्नीची हत्या केली आहे'', मध्यरात्री 100 क्रमांकावर आलेल्या फोनमुळे पोलीस देखील चक्रावून गेले.

नवी दिल्ली -  ''हॅलो साहेब ! मला अटक अटक करा, मी माझ्या पत्नीची हत्या केली आहे'', मध्यरात्री 100 क्रमांकावर आलेल्या फोनमुळे पोलीस देखील चक्रावून गेले. एका व्यक्तीनं आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आदर्श नगर परिसरात घडला आहे. सिलिंडर डोक्यात घालून एका व्यक्तीनं आपल्या पत्नीची हत्या केली आहे. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी जो काही प्रकार पाहिला, त्यानं त्यांनाही जबर धक्का बसला. 

बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेच्या शेजारी एक व्यक्ती बसलेला होता. मृत महिलेच्या शेजारी रक्तानं माखलेला एक छोटा सिलिंडरदेखील होता. यानंतर तातडीनं पोलिसांनी महिलेला जवळील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान, पत्नीची हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

डीसीपी असलम खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव कविता असे होते आणि तिच्या पतीचे नाव सुनील शर्मा असे आहे. या दोघांच्या लग्नाला 12 वर्ष पूर्ण झाली होती. त्यांना एका 4 वर्षांची मुलगीदेखील आहे. सुनील हा मूळचा अलिगड येथील रहिवासी आहे. आरोपीनं संशयातून पत्नीची हत्या केली. 

पत्नीची का केली हत्या?सुनीलला आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. या संशयावरुन दोघांमध्ये जवळपास दीड महिन्यांपासून वादावादी सुरू होती. ज्यावर सुनीलला संशय होता, त्या व्यक्तीची शेजाऱ्यांकडे ये-जा सुरू होती. याच कारणावरुन सोमवारी रात्रीदेखील दोघांमध्ये प्रचंड वाद झाला. यादरम्यान, मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास सुनीलनं पत्नीच्या डोक्यात पाच किलोचा सिलिंडर घातला. या घटनेत कविताच्या डोक्याचा पूर्णतः चेंदामेंदा झाला. तिचा जागेवरच मृत्यू झाला.

यानंतर सुनीलनं कुटुंबीयांना जागं करत रात्री 2.20 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना संपर्क साधला आणि त्यांना गुन्ह्याबाबतची माहिती दिली. पोलिसांना फोन करत सुनीलनं सांगितले की, मी आपल्या पत्नीची हत्या केली आहे, मला येऊन अटक करा. संबंधित व्यक्तीनं दारूच्या नशेत फोन केल्याचे सुरुवातीला पोलिसांना वाटले. मात्र घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर त्यांनाही धक्का बसला. घरातील भितींवर चारही बाजूंना रक्तच-रक्त झाले होते. 

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून चौकशी सुरू आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनNew Delhiनवी दिल्ली