शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

Delhi Mundka Fire : मृत्यूचं तांडव! WhatsApp वरील 'त्या' एका मेसेजमुळे वाचला तब्बल 100 जणांचा जीव; नेमकं काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 11:06 IST

Delhi Mundka Fire : आगीची भीषणता लक्षात घेऊन मुंडका आणि आजूबाजूच्या भागातील लोकांनी व्हॉट्सअ‍ॅपच्या  माध्यमातून इतर लोकांना माहिती देऊन लवकरात लवकर घटनास्थळी पोहोचण्यास सांगितलं.

नवी दिल्ली - दिल्लीच्या पश्चिमेकडील मुंडका मेट्रो स्थानकाजवळील चार मजली व्यावसायिक इमारतीला शुक्रवारी संध्याकाळी लागलेल्या आगीत 27 जणांचा मृत्यू झाला, 12 जण जखमी झाले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागली होती. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि राउटर बनवणाऱ्या कंपनीचे कार्यालय होतं. हळूहळू आग दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरही पसरली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 30 हून अधिक गाड्यांना पाचारण करण्यात आलं होतं. याच दरम्यान महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 

आगीची भीषणता लक्षात घेऊन मुंडका आणि आजूबाजूच्या भागातील लोकांनी व्हॉट्सअ‍ॅपच्या  माध्यमातून इतर लोकांना माहिती देऊन लवकरात लवकर घटनास्थळी पोहोचण्यास सांगितलं. व्हॉट्सअ‍ॅपवरील एका मेसेजमुळे जवळपास 100 जणांचा जीव वाचवणं शक्य झाल्याचं म्हटलं जात आहे. यावेळी क्रेनचीही व्यवस्था करण्यात आल्याचं स्थानिक रहिवासी रमेश यांनी सांगितलं. आग दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचेपर्यंत सुमारे 100 लोकांना बाहेर काढण्यात आलं. आमचे प्रयत्न बराच वेळ चालले, पण जेव्हा आगीनं संपूर्ण इमारतीला वेढलं, तेव्हा आमच्याकडे काहीच पर्याय उरला नाही, असंही रमेश यांनी म्हटलं आहे.

इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर मोठ्या संख्येनं लोक होते. अशा परिस्थितीत आम्ही दुसऱ्या मजल्यावरून लोकांना बाहेर काढण्यावर अधिक भर दिला. व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाहिल्यानंतर आजूबाजूचे सुमारे दोनशे लोक येथे पोहोचले. सचिन यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी अशी दुर्घटना यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. ही एक भयानक घटना आहे. एवढ्या लोकांचा एकत्रित मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर पोलिसांनी कठोरात कठोर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात अशी घटना घडू नये. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीचे मालक हरीश गोयल आणि वरूण गोयल यांना अटक करण्यात आली आहे. परंतु त्या घराचा मालक अद्याप फरार आहे. "दिल्लीत लागलेल्या भीषण आगीच्या घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दु:ख झाले आहे. मी संवेदना व्यक्त करतो. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करतो. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या लोकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना पन्नास-पन्नास हजार रुपयांची मदत दिली जाईल,” अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

 

टॅग्स :delhiदिल्लीfireआग