नवी दिल्ली - देशाची राजधानी नवी दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (एनसीआर) प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे या हंगामातील हवेची गुणवत्ता सर्वांत वाईट झाल्याने दिल्लीची अवस्था एखाद्या गॅस चेंबरसारखी झाली आहे. मंगळवारी दिल्ली-एनसीआर क्षेत्रातील हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ४२३ म्हणजे अत्यंत गंभीर श्रेणीत नोंदवण्यात आला. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्राने अनावश्यक बांधकाम, दगड फोडण्याची यंत्रे व खाणकामांवर बंदी यासारख्या उपयायोजना केल्या आहेत.
- केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सोमवारी जारी केलेल्या २४ तासांच्या आकडेवारीनुसार एक्यूआय अत्यंत खराब श्रेणीत म्हणजे ३६२ नोंदवण्यात आला. मंगळवारी सकाळी प्रदूषणात भर पडल्याने एक्यूआय ४२३ नोंदवण्यात आला. - दिवाळीनंतर दिल्लीतील हवेची गुणवत्ता सातत्याने खराब किंवा अत्यंत खराब नोंदवण्यात येत आहे. प्रदूषण कमी होण्याऐवजी वाढत असल्याने त्यात भरच पडत आहे.
सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीपंजाब व हरियाणात शेतकरी मोठ्या प्रमाणावर पेंढा जाळत असल्याने दिल्ली-एनसीआरमधील हवेचा दर्जा खालावत असल्याची माहिती मंगळवारी सर्वोच्च न्यायालयास देण्यात आली. सर्वोच्च न्यायालयात बुधवारी या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.
Web Summary : New Delhi's air quality has deteriorated to a severely toxic level, resembling a gas chamber. The air quality index reached a dangerous 423. Construction and mining activities are now banned. The Supreme Court will hear the case regarding stubble burning in Punjab and Haryana.
Web Summary : नई दिल्ली की हवा की गुणवत्ता गंभीर रूप से जहरीली हो गई है, जो गैस चैंबर जैसी है। वायु गुणवत्ता सूचकांक खतरनाक 423 तक पहुंच गया। निर्माण और खनन गतिविधियों पर प्रतिबंध लगा दिया गया है। सुप्रीम कोर्ट पंजाब और हरियाणा में पराली जलाने के मामले की सुनवाई करेगा।