चिंताजनक! ब्रिटनहून भारतात आलेले २१ प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 12:47 IST2020-12-23T12:44:33+5:302020-12-23T12:47:43+5:30
कोरोना पॉझिटीव्ह आढलेले प्रवासी दिल्ली, चेन्नई, अमृतसर, कोलकाता, अहमदाबाद अशा वेगवेगळ्या विमानतळांवर दाखल झालेले आहेत.

चिंताजनक! ब्रिटनहून भारतात आलेले २१ प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह
नवी दिल्ली
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका वाढलेला असताना भारतासाठी आता चिंता वाढली आहे. ब्रिटनहून एअर इंडियाच्या विमानातून भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये पोहोचलेले एकूण २१ प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत.
कोरोना पॉझिटीव्ह आढलेले प्रवासी दिल्ली, चेन्नई, अमृतसर, कोलकाता, अहमदाबाद अशा वेगवेगळ्या विमानतळांवर दाखल झालेले आहेत. या शहरांमध्ये आता संबंधित प्रशासाने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगला सुरुवात करण्यात आली आहे.
महत्वाची बाब म्हणजे, कोरोना पॉझिटीव्ह आढळून आलेले प्रवासी हे ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने संक्रमित झालेले आहेत का? हे अद्याप समोर आलेलं नाही. कोरोना पॉझिटीव्ह आढळेल्या व्यक्तींचे नमुने पुण्याच्या 'नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी'कडे चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
अमृतसरमध्ये सर्वाधिक ८ प्रवासी पॉझिटीव्ह
एअर इंडियाच्या ब्रिटनहून अमृतसरला आलेल्या विमानतील ७ प्रवासी आणि एक वैमानिक दलातील सदस्य कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे. या विमानात एकूण २५० प्रवासी होते.
यापाठोपाठ दिल्ली विमानतळावर ५, अहमदाबाद ४, कोलकाता २ आणि चेन्नईत एक प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत.