शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या कार्यकारिणीतून सुशीलकुमार शिंदे अन् दिग्विजयसिंह 'आऊट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 16:56 IST

काँग्रेसकडून पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या नव्या कार्यकारिणीमध्ये युवा वर्गाचाही समावेश करण्यात आला आहे. तर काही ज्येष्ठ सदस्यांना बाहेर काढण्यात आले आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसकडून पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या नव्या कार्यकारिणीमध्ये युवा वर्गाचाही समावेश करण्यात आला आहे. तर काही ज्येष्ठ सदस्यांना बाहेर काढण्यात आले आहे. जुन्या कार्यकारिणीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांना 'आऊट' करण्यात आले आहे. या कार्यकारिणीमध्ये 23 सदस्य, 19 निमंत्रित स्थायी सदस्य आणि 9 निमंत्रित सदस्य असणार आहेत, असे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अशोक गेहलोत यांनी सांगितले. त्यामुळे राहुल गांधींच्या नव्या टीममध्ये 51 सदस्य असतील.

काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, पक्षाचे खजिनदार मोतीलाल वोरा, अशोक गहलोत, गुलाब नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे, एके एंटोनी, अहमद पटेल, अंबिका सोनी आणि ओमन चांडी यांना स्थान देण्यात आले आहे. यांसह आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगई, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिश रावत, ज्येष्ठ नेते आनंद शर्मा, कुमारी शैलजा, मुकूल वासनिक, अविनाश पांडे, केसी वेणुगोपाल, दीपक बाबरिया, ताम्रध्वज साहू, रघुवीर मीणा आणि गैखनगम यांचाही काँग्रेस कार्यकारिणीत समावेश झाला आहे.

निमंत्रित स्थायी सदस्य - काँग्रस कार्यकारिणीच्या निमंत्रित स्थायी सदस्यांमध्ये दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, माजी वित्तमंत्री पी.चिदंबरम, ज्योदिरादित्य सिंधिया, बाळासाहेब थोरात, तारिक हमीद कारा, पी.सी. चाको, जितेंद्रसिंह, आरपीएनसिंह, पी.एल.पुनिया, रणदीप सुरजेवाला, आशा कुमारी, रजनी पाटील, रामचंद्र खुटिया, अनुग्रह नारायण सिंह, राजीव सातव, शक्तिसिह गोहिल, गौरव गोगई आणि ए. चेल्लाकुमार यांचा समावेश आहे. 

विशेष निमंत्रित सदस्य - विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये केएच. मुनियप्पा, अरुण यादव, दीपेंद्र हुडा, जितिन प्रसाद, कुलदीप विश्नोई, इंटकचे अध्यक्ष जी.संजीव रेड्डी, भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष केशवचंद यादव, एनएसयुआयचे अध्यक्ष फिरोज खान, आखिल भारतीय महिला काँग्रेस अध्यक्षा सुष्मिता देव आणि काँग्रेस सेवा दलाचे प्रमुख संगठक लालजीभाई देसाई यांचा समावेश करण्यात आला आहे. 

दरम्यान, या पूर्वीच्या कार्यकारिणीतील बीके हरिप्रसाद, सीपी जोशी, दिग्विजय सिंह, हेमो पूर्वा सैकिया, जनार्दन द्विवेदी, कमल नाथ, मोहन प्रकाश, सुशील कुमार शिंदे, सुशीला तिरिया, आशा कुमारी, ए चेला कुमार, कर्ण सिंह, ऑस्कर फर्नांडीज आणि के एच मुनियप्पा यांना बाहेर काढण्यात आले आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीManmohan Singhमनमोहन सिंग