शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा नवा अध्यक्ष रिमोट कंट्रोलवर चालणार? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 20:21 IST

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसंदर्भात, पक्षाला नवा अध्यक्ष मिळाला तरी, तो गांधी कुटुंबाच्या रिमोट कंट्रोलनेच चालेल, असे काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

गांधी कुटुब पक्षाचा पुढील अध्यक्ष रिमोट कंट्रोलने चालवेल, असे बोलले जात असतानाच, काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी हा आरोप शनिवारी फेटाळून लावला आहे. यासंदर्भात बोलताना राहुल गांधी म्हणाले, अध्यक्ष पदाची निवडणूक लढत असलेले मल्लिकार्जुन खडगे आणि शशी थरूर हे दोन्ही दिग्गज आणि चांगली समज असणारे उमेदवार  आहेत. या लोकांच्या बाबतीत अशा पद्धतीचे वक्तव्य करणे म्हणजे, त्यांचा अपमान करण्यासारखे आहे. एवढेच नाही, तर आपला तपश्चर्येवर विश्वास आहे आणि 'भारत जोडो यात्रे'च्या माध्यमाने लोकांशी संपर्क साधून त्यांच्या समस्या जगासमोर आणण्याची आपली इच्छा आहे, असेही राहुल यांनी म्हटले आहे.

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसंदर्भात, पक्षाला नवा अध्यक्ष मिळाला तरी, तो गांधी कुटुंबाच्या रिमोट कंट्रोलनेच चालेल, असे काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे. यासंदर्भात विचारले असता, राहुल म्हणाले, 'निवडणुकीला सामोरे जात असलेल्या दोन्ही लोकांचा एक दर्जा आहे, त्यांचा एक दृष्टिकोण आहे आणि ते चांगली जाण असलेले दिग्गज नेते आहेत. त्यांपैकी कुणीही रिमोट कंट्रेलने चालणारे आहे, असे मला वाटत नाही. खरे तर, ही चर्चा त्यांना अपमानित करण्यासाठी सुरू आहे.' 

द्वेष पसरवणाऱ्यांविरोधात लढणार - केंद्र सरकारने नुकतीच बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि काँग्रेसमधील संबंधांसंदर्भात भाजपने केलेल्या आरोपांवर बोलताना राहुल गांधी म्हणाले, द्वेष आणि हिंसा पसरवणे एक देश विरोधी कार्य आहे आणि यात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्ती विरोधात आम्ही लढणार. मग, ती व्यक्ती कोण आहे आणि कुठल्या समाजाची आहे, यात काहीही फरक पडत नाही. द्वेष आणि हिंसा पसरवणे हे एक राष्ट्र विरोधी कार्य आहे आणि आम्ही अशा लोकांविरोधात लढू.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा