शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

नया साल वॅक्सीन के रूप में...; देशात लसीकरणाला सुरुवात होताच नवीन कॉलरट्यून जारी

By कुणाल गवाणकर | Published: January 16, 2021 8:30 PM

अमिताभ बच्चन यांचा आवाज हटवला; नव्या कॉलरट्यूनमध्ये लसीकरणाच्या सूचना

नवी दिल्ली: जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणाची सुरुवात भारतात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज लसीकरण अभियानास प्रारंभ झाला. त्यानंतर आता कोरोना लसीकरणावर आधारित नवीन कॉलरट्यून जारी करण्यात आली आहे. याआधीच्या कॉलरट्यूनमध्ये अमिताभ बच्चन यांचा आवाज होता. आताच्या कॉलरट्यूनमध्ये व्हॉईज ओव्हर आर्टिस्ट जसलीन भल्ला यांचा आवाज आहे. कोरोना लसीकरण अभियानाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी नवी कॉलरट्यून जारी करण्यात आली. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनदेखील यातून करण्यात आलं आहे.'नवीन वर्ष कोविड-१९ लसीच्या रुपात आशेचा नवा किरण घेऊन आलं आहे. भारतात विकसित करण्यात आलेली लस सुरक्षित आणि प्रभावी आहे. ती कोविड विरुद्ध आपल्या शरीरात प्रतिकारक्षमता निर्माण करते,' अशी माहिती नव्या कॉलरट्यूनच्या माध्यमातून देण्यात आली आहे. लसीवर विश्वास ठेवा आणि अफवांकडे दुर्लक्ष करा, असं आवाहन करण्यात आलं आहे. 'भारतीय लसीवर विश्वास ठेवा. तुमचा नंबर आल्यावर नक्की लस टोचून घ्या. अफवांवर विश्वास ठेवू नका,' अशी सूचना कॉलरट्यूनमधून करण्यात आली आहे.याआधी कॉलरट्यूनमध्ये सुरुवातीला खोकल्याचा आणि त्यानंतर अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकू यायचा. कोविड-१९ चा धोका टाळण्यासाठी घ्यायच्या खबरदारीची माहिती बिग बी द्यायचे. कॉलरट्यूनमधून अमिताभ बच्चन यांचं आवाज हटवण्याची मागणी एका जनहित याचिकेच्या माध्यमातून दिल्ली उच्च न्यायालयात करण्यात आली होती. अमिताभ आणि त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांनाच कोरोना झाल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलं होतं. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसAmitabh Bachchanअमिताभ बच्चन