नेस वाडिया यांच्या पत्रात ९ साक्षीदारांची नावे
By Admin | Updated: July 3, 2014 04:13 IST2014-07-03T04:13:19+5:302014-07-03T04:13:19+5:30
अभिनेत्री प्रीती झींटा विनयभंगप्रकरणी उद्योगपती नेस वाडीया यांनी मरिन ड्राइव्ह पोलिसांना पत्र धाडून नऊ साक्षीदारांची नावे सादर केली आहेत.

नेस वाडिया यांच्या पत्रात ९ साक्षीदारांची नावे
मुंबई : अभिनेत्री प्रीती झींटा विनयभंगप्रकरणी उद्योगपती नेस वाडीया यांनी मरिन ड्राइव्ह पोलिसांना पत्र धाडून नऊ साक्षीदारांची नावे सादर केली आहेत. प्रीतीने केलेली तक्रार खोटी असून पत्रात नमूद साक्षीदार ३० मे रोजी वानखेडे स्टेडीयमवर घडलेला नेमका घटनाक्रम ते तटस्थपणे सांगू शकतात. प्रीतीने तक्रार दिल्यानंतर नेस-पोलीस यांच्यातील हा पहिलाच अधिकृत संवाद आहे.
नेस यांनी हे पत्र तपास अधिकाऱ्याच्या नावे लिहिलेले असून आज दुपारी आपल्या प्रतिनिधीमार्फत मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात पोहोचवले. या पत्रात सारिका लाल, लॉरेटा जोसेफ, पुजा दादलानी, अॅनलीन अॅडम्स, फराह ओमरभाई, स्वीटी बर्मन, कमलेश शहा, रायन मुस्तफा आणि शरत नाथ यांचा उल्लेख आहे. या सर्वांचे जबाब नोंदविणार का असे विचारले असता पोलीस उपायुक्त रविंद्र शिसवे यांनी सांगितले की गरज पडल्यास नेस यांनी दिलेल्या साक्षीदारांचे जबाब नोंदविले जातील.
आयपीएल हा सुरूवातीपासून माझा प्रॉजेक्ट होता. आयपीएल स्पर्धेसाठी खेळाडूंच्या लिलावात मी पाच कोटी रूपये खर्च केले. पाच कोटी इतकी मोठी रक्कम मी फक्त माझ्यासाठीच नव्हते तर नेस यांच्यासाठीही खर्च केली होती. याचे पुरावे बीसीसीआयकडून मिळू शकतील.
पुढे दोन महिन्यांनी नेस यांनी मला मुददलच परत केली. तेव्हा या तक्रारीमागे माझे आर्थिक गणित आहे, हा आरोप इथेच थांबायला हवा, असेही प्रीतीने म्हंटले आहे.
मला प्रसिद्धी नको, सवंग प्रसिद्धी नकोच नको. आयुष्यात भूतकाळापेक्षा भविष्यकाळ महत्वाचा असतो, हे माझे तत्व आहे. आयुष्य भविष्याच्या दिशेने पुढे सरकते, मीही भूतकाळ मागे सोडून भविष्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे, अशी भावनाही प्रीतीने व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)