प्रीतीमुळे नेस वाडिया पुरते अडचणीत

By Admin | Updated: June 25, 2014 14:05 IST2014-06-25T00:58:42+5:302014-06-25T14:05:05+5:30

उद्योगपती नेस वाडिया यांच्याविरोधात दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात आज अभिनेत्री प्रीती ङिांटाने वानखेडे स्टेडिअममध्ये मरिन ड्राइव्ह पोलिसांना पुरवणी जबाब दिला.

Ness Wadia suffers from love | प्रीतीमुळे नेस वाडिया पुरते अडचणीत

प्रीतीमुळे नेस वाडिया पुरते अडचणीत

>मुंबई  : उद्योगपती नेस वाडिया यांच्याविरोधात दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात आज अभिनेत्री प्रीती ङिांटाने वानखेडे स्टेडिअममध्ये मरिन ड्राइव्ह पोलिसांना पुरवणी जबाब दिला. यात तिने एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदारासह सुमारे चार ते पाच नव्या साक्षीदारांची नावे दिली. प्रीतीने 3क् मे रोजी स्टेडिअमच्या गरवारे स्टॅण्ड आणि मैदानात नेसकडून मिळालेल्या वागणुकीचा घटनाक्रम पोलिसांना समजावून सांगितला. तसेच आधीच्या तक्रारीतून पोलिसांना पडलेल्या अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरेही दिली. स्टेडिअममध्ये घडलेल्या या घडामोडीतून नेस इज अन ट्रबल(पुरते अडचणीत सापडल्याची प्रतिक्रिया तपासाशी संबंधित एका वरिष्ठ अधिका:याने ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
3क् मे रोजी गरवारे स्टॅण्ड आणि मैदानात तीनदा नेस यांनी चारचौघांत अर्वाच्च शिव्या दिल्या, जोरजोरात ओरडले. त्यापैकी एका घटनेत त्यांनी हाताला धरून ओढण्याचा प्रय} केला, अशी तक्रार 12 जूनला प्रीतीने मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्याला दिली होती. त्यानुसार पोलिसांनी नेस यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवला. मात्र त्यानंतर लागलीच लॉस एन्जेलीसला रवाना झालेल्या प्रीतीची तक्रार त्रोटक असल्याची जाणीव पोलिसांना झाली. त्यानुसार त्यांनी तिला पुरवणी जबाब नोंदविण्यासाठी बोलावले होते. विवारी मुंबईत परतलेली प्रीती मंगळवारी संध्याकाळी सातच्या सुमारास आलिशान लेक्सस गाडीतून वानखेडे स्टेडिअममध्ये पुरवणी जबाबासाठी आली. स्टेडिअममधील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यालयात पोलिसांनी तिचा जबाब नोंदविला. सुमारे दीड तास ही प्रक्रिया चालली. त्यानंतर गरवारे स्टॅण्ड आणि मैदानात नेमके कुठे, काय घडले हे तिने सांगितले. महत्त्वाचे म्हणजे काही वर्षाचे प्रेमसंबंध तुटल्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये नेसकडून मिळत असलेली वाईट वागणूकही तिने कथन केली. तसेच वानखेडेवरील वाद नेमका कशामुळे घडला, हेही तिने सांगितले. त्यात गरवारे स्टॅण्डमधील पहिल्या रांगेतील आसनव्यवस्था हेही एक कारण असल्याचे समजते.
यापैकी एका घटनेत नेस शिवीगाळ करत असताना जीन नावाचा तरूण मधे पडला आणि त्याने आमच्यातला वाद मिटविण्याचा प्रय} केला, असे तिने जबाबात सांगितल्याचे समजते. हा तरूण प्रीतीचा पाहुणा होता. तिच्या निमंत्रणावरून तो 3क् मे रोजी वानखेडेत पार पडलेला चेन्नई विरुद्ध पंजाब सामना पाहण्यास आला होता. पोलिसांच्या दृष्टीने तो या प्रकरणातला प्रमुख प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. पोलीस त्याचाही जबाब लवकर  नोंदवणार आहेत. याशिवाय आणखी चार ते पाच नव्या साक्षीदारांची नावे प्रीतीने जबाबात घेतली. या व्यक्ती घटना घडली तेव्हा आसपास उपस्थित होत्या, ते पोलिसांनी सांगितले.
नेस यांनी नेमक्या काय शिव्या दिल्या, काय भाषा वापरली हेही जाणून घेण्याचा प्रय} पोलिसांनी केला. ते शब्द बोलण्यास संकोच वाटत असल्यास लिहून द्या, अशी विनंतीही पोलिसांनी केली. त्यानुसार नेस-प्रीती यांच्यातला नेमका संवाद पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते.
प्रीतीचा पुरवणी जबाब नोंदवण्यात आला. शिवाय घटना ज्या ज्या ठिकाणी घडल्या त्याचा प्रीती समक्ष स्पॉट पंचनामा केला, अशी माहिती पोलीस उपायुक्त रविंद्र शिसवे यांनी दिली. मात्र प्रीतीने पुरवणी जबाबात नेमके काय सांगितले हे मात्र सांगण्यास त्यांनी नकार दिला. नेस यांना अटक होईल, की त्यांचाही जबाब नोंदवला जाईल याबाबत त्यांनी मौन पाळले. (प्रतिनिधी)
 
नेसवर दोन दिवसांत कारवाई?
प्रीतीचा पुरवणी जबाब नोंदविण्याआधी मरिनड्राईव्ह पोलिसांनी या प्रकरणी ज्या आठ जणांचे जबाब नोंदविले त्यापैकी दोनेक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. त्यांनी जबाबातून प्रीतीची तक्रार खरी असल्याचे स्पष्ट केले. त्यात प्रीतीने नोंदवलेल्या पुरवणी जबाबातून हा पुरावा आणखी भक्कम झाल्याची माहिती मिळते. या जोरावर येत्या दोनेक दिवसांत नेस यांना याप्रकरणी अटक होण्याची शक्यता आहे. 

Web Title: Ness Wadia suffers from love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.