नेस वाडियांना लवकरच अटक?

By Admin | Updated: June 15, 2014 03:19 IST2014-06-15T03:19:02+5:302014-06-15T03:19:02+5:30

द्योगपती नेस वाडिया यांना येत्या आठवड्यात अटक केली जाण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी व्यक्त केली.

Ness Wadia arrested soon? | नेस वाडियांना लवकरच अटक?

नेस वाडियांना लवकरच अटक?

मुंबई : सिनेअभिनेत्री व ‘आयपीएल’ क्रिकेट स्पर्धेतील किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाची सहमालक प्रीती झिंटा हिला धमकावणे, छळ करणे व तिचा पाणउतारा करणे इत्यादी गुन्ह्यांसाठी तिचा माजी ‘बॉय फ्रेण्ड’ व उद्योगपती नेस वाडिया यांना येत्या आठवड्यात अटक केली जाण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी व्यक्त केली.
नेस वाडिया यांच्याविरुद्ध मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्याने गुन्हा नोंदविला आहे. गेल्या ३० मे रोजी वानखेडे स्टेडियममध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब व चेन्नई सुपर किंग्ज या संघांदरम्यान आयपीएलचा सामना सुरू असताना वाडिया यांनी जे वर्तन केले, त्यासंदर्भात प्रीती झिंटाने ही फिर्याद केली आहे. याबाबत, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तपासासाठी दोन स्वतंत्र तुकड्या तयार केल्या गेल्या आहेत. एक तुकडी त्या दिवशीच्या वानखेडे स्टेडियममधील सीसीटीव्ही फुटेजची छाननी करीत आहे, तर दुसरी साक्षीदारांचे जबाब नोंदवत आहे. यातून झिंटा हिच्या फिर्यादीस पुष्टी मिळाली की, आरोपी वाडिया यांचाही जबाब घेतला जाईल व त्यानंतरच त्यांना अटक केली जाऊ शकेल. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या खेळाडूंचे जबाब घेतले जाणार नाहीत, कारण कथित घटना घडली तेव्हा ते खेळाडूंसाठी असलेल्या वेगळ्या जागेत बसलेले होते, असे मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मात्र स्टेडियममधील कर्मचारीवर्ग व आयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदररामन यांचे जबाब घेतले जातील, असे आणखी एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Ness Wadia arrested soon?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.