नेहरूंची प्रशंसा करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली!

By Admin | Updated: May 28, 2016 01:24 IST2016-05-28T01:24:34+5:302016-05-28T01:24:34+5:30

आधुनिक भारताचे शिल्पकार आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची फेसबुक पोस्टवर प्रशंसा करणारे बरवाणीचे जिल्हाधिकारी अजय सिंह गंगवार यांची

Nepalese applauding official! | नेहरूंची प्रशंसा करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली!

नेहरूंची प्रशंसा करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली!

भोपाळ : आधुनिक भारताचे शिल्पकार आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची फेसबुक पोस्टवर प्रशंसा करणारे बरवाणीचे जिल्हाधिकारी अजय सिंह गंगवार यांची मध्य प्रदेशातील भाजप सरकारने गुरुवारी रात्रीच तडकाफडकी बदली केली.
भोपाळस्थित मंत्रालयात उपसचिव पदावर त्यांची बदली करण्यात आली आहे, असे राज्याच्या जनसंपर्क विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.नेहरुंची प्रशंसा करणारी फेसबुकवरी पोस्ट अन्य सोशल मीडियावर झळकाल्यापासून त्यांची उचलबांगडी होईल, अशी दबकत चर्चा होती. आयएएस अधिकारी गंगवार यांनी हिंदीतून फेसबुकवरील पोस्टवर असे म्हटले होते की, नेहरुंनी करायलाच नको होती अशी चूक कोणती, हे मला समजले पाहिजे. मध्य प्रदेश सरकारच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले की, त्यांनी फेसबुकवर नेहरुंची प्रशंसा करून सेवाशर्तीचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांची बदली करण्यात आली.

Web Title: Nepalese applauding official!