निलोफरचे रौद्र रूप
By Admin | Updated: October 28, 2014 02:24 IST2014-10-28T02:24:43+5:302014-10-28T02:24:43+5:30
अरबी समुद्रातून उगम पावलेल्या निलोफर चक्रीवादळाचा वेग वाढत असून, 31 ऑक्टोबर रोजी कच्छच्या नलिया जिल्ह्याला ते धडक देईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

निलोफरचे रौद्र रूप
गुजरातमध्ये सतर्कतेचा इशारा; मात्र मुंबईला कोणताही धोका नाही
नवी दिल्ली/ अहमदाबाद : अरबी समुद्रातून उगम पावलेल्या निलोफर चक्रीवादळाचा वेग वाढत असून, 31 ऑक्टोबर रोजी कच्छच्या नलिया जिल्ह्याला ते धडक देईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हुडहुड चक्रीवादळाचे संकट टळताच येऊ घातलेल्या निलोफरसाठी केंद्र सरकारने मदत आणि बचाव कार्याच्या तयारीचा युद्धपातळीवर आढावा घेतला आहे.
निलोफरचा वेग वाढत असून, त्याच्या रौद्र रूपामुळे सौराष्ट्र आणि कच्छ भागात वेगवान वा:याच्या तडाख्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळ सचिव अजितकुमार सेठ यांनी सोमवारी चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी केल्या जाणा:या मदत आणि बचाव कार्याच्या तयारीचा आढावा घेतला. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या निलोफर या चक्रीवादळाचा मुंबईसह राज्याला धोका नसल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. मात्र पुढील चार दिवस निलोफरचा परिणाम म्हणून मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी जलधारा कोसळतील, असा अंदाज वर्तविला आहे.