शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ना मोबाईलची रिंग वाजणार, ना टीव्ही सुरू होणार, हे ९ गाव मौन पाळणार, अजब आहे कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2023 16:14 IST

Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशमधील कुल्लू जिल्ह्याला देवभूमी म्हटले जाते. कुल्लूची संस्कृती आणि परंपरा देशविदेशातील लोकांना आपल्याकडे आकर्षित करत असतात. येथे देवदेवतांप्रति आस्था बाळगली जाते. तसेच देवाचा आदेश हा सर्वोपरि मानला जातो.

हिमाचल प्रदेशमधील कुल्लू जिल्ह्याला देवभूमी म्हटले जाते. कुल्लूची संस्कृती आणि परंपरा देशविदेशातील लोकांना आपल्याकडे आकर्षित करत असतात. येथे देवदेवतांप्रति आस्था बाळगली जाते. तसेच देवाचा आदेश हा सर्वोपरि मानला जातो.

मनालीमधील गौशाल आणि आजूबाजूच्या आठ गावांमध्ये आता पुढच्या दीड महिन्यापर्यंत मौन आणि शांतता दिसून येणार आहे. येथे कसल्याही प्रकारचा मानवनिर्मित आवाज ऐकू येणार नाही. या गावांमध्ये या काळात टीव्ही सुरू होणार नाहीत, ना मंदिराची घंटी वाजणार नाही, तसेच मोबाईलची रिंगही वाजणार नाही. या काळात येथे येणाऱ्या पर्यटकांनाही या नियमाचं पालन करावं लागणार आहे. ऐकायला काहीशी अजब बाब असली, तरी ही गोष्ट खरी आहे.

मनालीमधील उझी खोऱ्यातील नऊ गावांमध्ये हजारो वर्षांपासून चालत आलेल्या या देव परंपरेचं आजही पालन केलं जातं. ऐतिहासिक गाव गौशाल येथे पुन्हा एकदा मकर संक्रांतीनंतर टीव्ही बंद करण्यात आला आहे. तसेच मोबाईल सायलेंड मोडवर टाकण्यात आले आहेत. तसेच कुठलीही व्यक्ती मोठ्या आवाजामध्ये बोलू शकत नाही. त्याशिवाय शेतीवाडीची कामंही होणार नाहीत.  मंदिरांमध्ये पूजेशिवाय इतर घंटा बांधण्यात आल्या आहेत. हा आदेश येथील आराध्य देवता गौतम ऋषी, व्यास ऋषी आणि नागदेवतेकडून आलेला आहे. तसेच दीड महिन्यापर्यंत ग्रामस्थ या आदेशाचे पालन करणार आहेत. मनालीमधील गौशाल, कोठी, सोलंग, पलचान, रुआड, कुलंग, नशनाग, बुरुआ आणि मझाच गावांमध्ये देव परंपरा पाळली जाते. तरुण पिढीसुद्धा या परंपरांचं पालन करत आहेत.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेHimachal Pradeshहिमाचल प्रदेश