शेजाऱ्यांची आपसात मारहाण
By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:31+5:302015-02-11T00:33:31+5:30
शेजाऱ्यांची आपसात मारहाण

शेजाऱ्यांची आपसात मारहाण
श जाऱ्यांची आपसात मारहाणनागपूर : घरासमोर ट्रक उभा करण्यासाठी पैसे न दिल्यामुळे ४ आरोपींनी ट्रकचालकास गंभीर जखमी करून त्याच्या जवळील २० हजार रुपये हिसकावले. ही घटना धम्मज्योतीनगरात सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. जुगराज सिंग मेजरसिंग जालदार (२२) रा. धम्मज्योतीनगर प्लॉट नं. ४९ हे आणि आरोपी दिलीप पांडुरंग गजभिये (५३), अजय दिलीप गजभिये, हर्षल दिलीप गजभिये (३०) आणि आशिष दिलीप गजभिये हे एकमेकांच्या शेजारी राहतात. सोमवारी सकाळी १० वाजता जुगराज सिंग आरोपींच्या घरासमोर ट्रक उभा करीत होता. आरोपीने त्याला घरासमोर ट्रक उभा करण्यासाठी पैसे मागितले. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी त्याला मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपींनी त्याच्याजवळील २० हजार रुपये हिसकावून नेले. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तर दिलीप पांडुरंग गजभिये (५३) यांनीही जुगराजसिंग जालदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुचाकी न दिल्याच्या रागावरून आपल्या दुचाकीचे नुकसान करून त्याबाबत विचारणा केल्यानंतर धारदार शस्त्राने आपणावर मेजरसिंगने वार केल्याचे त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे............