मित्रांचा निष्काळजीपणा तरुणाच्या जीवावार, तलावात बुडत असताना बाजूला उभे राहून काढत होते सेल्फी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 11:07 AM2017-09-26T11:07:09+5:302017-09-26T15:22:40+5:30

सेल्फीच्या वेडापायी अनेकांनी जीव गमावल्याच्या घटना समोर आल्या असताना आता एक 17 वर्षीय तरुणाच सेल्फीचा बळी ठरला आहे. मात्र यावेळी हे सेल्फीवेड त्याचं नाही तर त्याच्या मित्रांचं होतं. जेव्हा तरुण तलावात बुडत होता तेव्हा तिथेच तलावात मजा मस्ती करणारे मित्र मात्र सेल्फी काढण्यात व्यस्त होते

The negligence of the friends was standing on the side of the young man, while drowning in the lake | मित्रांचा निष्काळजीपणा तरुणाच्या जीवावार, तलावात बुडत असताना बाजूला उभे राहून काढत होते सेल्फी 

मित्रांचा निष्काळजीपणा तरुणाच्या जीवावार, तलावात बुडत असताना बाजूला उभे राहून काढत होते सेल्फी 

Next
ठळक मुद्दे17 वर्षीय विश्वास सेल्फीचा बळी ठरला आहेविश्वास तलावात बुडत होता तेव्हा तिथेच तलावात मजा मस्ती करणारे मित्र मात्र सेल्फी काढण्यात व्यस्त होतेतक्रारीच्या आधारे अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

बंगळुरु - सेल्फीच्या वेडापायी अनेकांनी जीव गमावल्याच्या घटना समोर आल्या असताना आता एक 17 वर्षीय तरुणच सेल्फीचा बळी ठरला आहे. मात्र यावेळी हे सेल्फीवेड त्याचं नाही तर त्याच्या मित्रांचं होतं. जेव्हा तरुण तलावात बुडत होता तेव्हा तिथेच तलावात मजा मस्ती करणारे मित्र मात्र सेल्फी काढण्यात व्यस्त होते. सेल्फी काढण्याकडे लक्ष नसतं तर कदाचित आपला मित्र बुडत असल्याचं त्यांना कळलं असतं, आणि जीव वाचवला असता. 17 वर्षीय तरुण नॅशनल कॉलेजचा विद्यार्थी होता. बंगळुरुपासून 40 किमी अंतरावर असणा-या रामनगर जिल्ह्यातील कनकपूरा येथे ही घटना घडली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचं नाव विश्वास असून दक्षिण बंगळुरुमधील हनुमंता नगर येथे तो राहायचा. त्याचे वडील गोविंदराजू ऑटोरिक्षा चालक असून त्याची आई सुनंगा गृहिणी आहे.

एनसीसीचा भाग असणारे 25 विद्यार्थी ट्रेकिंगसाठी डोंगरावर गेले होते. पाच वरिष्ठ एनसीसी कॅडेट्सनी कॉलेजकडे यासाठी परवानगी मागितली होती. प्रोफेसर गिरीश आणि शरद यांनी विद्यार्थ्यांना जाण्यासाठी परवानगी दिली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

विश्वास जेव्हा तलावात बुडत होता तेव्हा इतर कॅडेट्स सेल्फी काढण्यात व्यस्त होते. 'जेव्हा विश्वास बुडत होता तेव्हा सर्वांचं लक्ष सेल्फीसाठी मोबाइलमध्ये होतं, त्यामुळे आपला मित्र बुडतोय हे त्यांना कळलंच नाही', अशी माहिती पोलीस अधिक्षक रमेश बानोथ यांनी दिली आहे. रमेश बानोथ यांनी सांगितल्यानुसार, 'जवळपास दुपारी 2 वाजता सर्व विद्यार्थी तलावाजवळ गेले होते. तलावात उतरत त्यांनी पोहायला सुरुवात केली. ग्रामपंचायतीने धोक्याचा इशारा देणारा बोर्ड लावूनही विद्यार्थ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. विश्वासचा तोल गेला आणि तो गाळात अडकला. बाहेर येईपर्यंत कोणालाही विश्वास आपल्यातून बेपत्ता झाल्याचं कळलंच नाही'.

3.30 वाजता विश्वासचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि त्यानंतर त्याच्या कुटुंबियांना कळवण्यात आलं. कुटुंबियांनी कॉलेज प्रशासनावर हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला आहे. विश्वासच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 'तक्रारीच्या आधारे अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आम्ही तपास करत आहोत. आम्ही सर्व विद्यार्थ्यांची चौकशी करणार आहोत. मात्र अद्यार ते सर्व धक्क्यात आहेत', अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 
 

Web Title: The negligence of the friends was standing on the side of the young man, while drowning in the lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस