सहायक पोलीस निरीक्षकाची कानउघाडणी

By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:22+5:302015-01-29T23:17:22+5:30

हायकोर्टाने नोंदविले बयान : क्वचित येतो असा प्रसंग

Neglected Assistant Police Inspector | सहायक पोलीस निरीक्षकाची कानउघाडणी

सहायक पोलीस निरीक्षकाची कानउघाडणी

यकोर्टाने नोंदविले बयान : क्वचित येतो असा प्रसंग

नागपूर : आरोपीला वैद्यकीय तपासणी किंवा उपचारासाठी रुग्णालयात भरती करताना डॉक्टरला द्यावयाच्या पत्रात आरोपीचे बयान नमूद केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी सहायक पोलीस निरीक्षक नीलेश भदक यांची कानउघाडणी केली. डॉक्टरला द्यावयाच्या पत्रात आरोपीने सांगितलेली कथा लिहायला कुणी शिकविले. आरोपीने स्वत:च्या जखमांसंदर्भात सांगितलेले स्पष्टीकरण पत्रात नमूद करावे असे कुठे लिहिले आहे, असे प्रश्न न्यायालयाने विचारले व त्याची उत्तरे भदक यांना देता आली नाहीत.
आरोपीच्या पत्नीचे मृत्यूपूर्व बयान व डॉक्टरला दिलेल्या पत्रातील माहिती यात तफावत आढळून आल्यामुळे न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३९१ अंतर्गत भदक यांचे अतिरिक्त बयान नोंदविले. असे प्रसंग क्वचितच येतात. आरोपीलाही यावेळी उपस्थित ठेवण्यात आले होते. भदक यांनी घटनाक्रमाची माहिती दिल्यानंतर आरोपीचे वकील ॲड. राजेंद्र डागा यांनी उलटतपासणी केली.
मनोहर सुरजुसे (३२) असे आरोपीचे नाव असून तो केळवद येथील रहिवासी आहे. त्याच्यावर पत्नी शकुंतलाची जाळून हत्या केल्याचा आरोप आहे. ही घटना २९ जानेवारी २०११ रोजी घडली होती. त्यावेळी भदक पोलीस उपनिरीक्षक होते. त्यांनी शकुंतलाचे मृत्यूपूर्व बयान नोंदविले. त्यात शकुंतलाने मनोहरवर जाळल्याचा आरोप केला आहे. ३० जानेवारी रोजी आरोपीला अटक करण्यात आली. त्यावेळी त्याचे दोन्ही हात व पाय जळाले होते. यामुळे भदक यांनी आरोपीवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याला पत्र दिले. त्या पत्रात शकुंतलाने स्वत:ला जाळून घेतले व तिला वाचविताना दोन्ही हात व पाय जळाले असे आरोपीने सांगितल्याचे नमूद करण्यात आले आहे. भदक यांनी मृत्यूपूर्व बयान व पत्रात नोंदविलेल्या माहितीमध्ये तफावत असल्याची बाब ॲड. डागा यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती.

Web Title: Neglected Assistant Police Inspector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.