शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

नीट परीक्षेत शून्य गुण, तरीही मिळाला मेडिकलला प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 6:00 AM

देशातील शैक्षणिक क्षेत्राचा कसा खेळखंडोबा झाला आहे, याचे उदाहरण २०१७ मधील एमबीबीएसच्या प्रवेशावरून दिसून येते.

नवी दिल्ली : देशातील शैक्षणिक क्षेत्राचा कसा खेळखंडोबा झाला आहे, याचे उदाहरण २०१७ मधील एमबीबीएसच्या प्रवेशावरून दिसून येते. ज्या विद्यार्थ्यांना नीट परीक्षेत १ किंवा २ अथवा दोन्ही विषयात शून्य व सिंगल डिजिट गुण मिळालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना एमबीबीएससाठी प्रवेश मिळाल्याचे प्रकार समोर आले आहेत.मेडिकलच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेत किमान ४०० विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीत सिंगल डिजिट गुण मिळाले आहेत, तर ११० विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाले आहेत. तरीही या सर्व विद्यार्थ्यांना एमबीबीएससाठी प्रवेश मिळाला आहे. यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांना खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे.२०१७ मध्ये प्रवेश मिळालेल्या १९९० विद्यार्थ्यांच्या गुणांचे विश्लेषण केले असता असे दिसून आले की, त्यांचे गुण १५० पेक्षा कमी होते. ५३० असे विद्यार्थी दिसून आले, ज्यांचे फिजिक्स, केमिस्ट्री किंवा दोन्ही विषयांचे गुण शून्य किंवा सिंगल डिजिट होते. मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने एमबीबीएस प्रवेशासाठी ५० टक्के एवढ्या किमान गुणांची अट ठेवली होती. (राखीव जागांसाठी ४० टक्के) मात्र, मेडिकल कौन्सिलने २०१२ मध्ये यात बदल केले आणि किमान गुणांवरही प्रवेश होऊ लागले. त्याचा परिणाम असा झाला की, अनेक महाविद्यालयात शून्य किंवा सिंगल डिजिट गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळाला.>ट्युशन फी१७ लाख रुपयेएमबीबीएस प्रवेशासाठी १५० किंवा त्यापेक्षा अधिक गुण घेऊन प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची अनेक उदाहरणे आहेत. १५० किंवा त्यापेक्षा अधिक गुणांवर झालेल्या ५३० प्रवेशांपैकी ५०७ प्रवेश हे खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील आहेत. त्यांनी ट्युशन फी म्हणून सरासरी १७ लाख रुपये प्रति वर्ष प्रमाणे फी भरली आहे. यात होस्टेल, मेस, लायब्ररी आणि अन्य खर्च यांचा समावेश नाही. यातून असे दिसते की, नीटमध्ये कमी गुण मिळूनही केवळ पैशांच्या जिवावर विद्यार्थ्यांना मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे. यातील अर्ध्यापेक्षा अधिक विद्यार्थी डीम्ड युनिव्हर्सिटीतील असून, या युनिव्हर्सिटींना स्वत:ची परीक्षा घेण्याचा अधिकार आहे. जर या विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली, तर ते डॉक्टर म्हणून रजिस्ट्रेशन करू शकतात आणि प्रॅक्टिसही करू शकतात.

टॅग्स :doctorडॉक्टरfraudधोकेबाजी