शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
3
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
4
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
5
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
6
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
7
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
8
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
9
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
10
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
11
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
12
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
13
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
14
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

२१ मे रोजीच होणार नीट-पीजी परीक्षा; पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 7:01 AM

दोन लाख सहा हजाराहून अधिक डॉक्टर यंदाची नीट-पीजी परीक्षा देणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : यंदाच्या वर्षीची नीट-पीजी परीक्षा पुुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. ही परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी करणारी याचिका काही डॉक्टरांनी दाखल केली होती. मात्र असा निर्णय घेतल्यास डॉक्टरांचा तुटवडा भासून त्याचा रुग्णांच्या उपचारांवर परिणाम होईल, असे न्यायालयाने सांगितले. त्यामुळे आता  ही परीक्षा आता २१ मे रोजीच होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. धनंजय चंद्रचूड व न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठाने सांगितले की, नीट-पीजी परीक्षा पुढे ढकलल्यास गोंधळ व अनिश्चिततेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या विद्यार्थ्यांमध्ये दोन गट आहेत. एका गटाला या परीक्षा पुढे ढकलाव्यात, असे वाटते. मात्र अनेकांना या परीक्षा वेळेवर व्हायला हव्या आहेत. दोन लाख सहा हजाराहून अधिक डॉक्टर यंदाची नीट-पीजी परीक्षा देणार आहेत.

एकाच कालावधीत दोन परीक्षा घेण्यास विरोधn    सध्या नीट-पीजी २०२१ ही परीक्षा सुरू असून, त्याचदरम्यान २१ मे रोजी यंदाच्या वर्षीची नीट-पीजी परीक्षा घेतल्यास अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. n    त्यामुळे यंदाची नीट-पीजी परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी करणारी याचिका काही डॉक्टरांनी दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी घेण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने दर्शविली होती. 

टॅग्स :NEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालdoctorडॉक्टर