शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

NEET-PG Exam Date: अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 13:32 IST

NEET-PG Exam Date Supreme Court News: नीट पीजी परीक्षा ऑगस्टमध्ये घेण्यासंदर्भात एनबीई अर्थात राष्ट्रीय परीक्षा मंडळाने सर्वोच्च न्यायालयाकडे विनंती केली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी मान्य केली असून, ३ ऑगस्ट रोजी परीक्षा घेतली जाणार आहे.

Supreme Court NEET-PG Exam Date: पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेशपूर्व परीक्षा अर्थात नीट पीजी परीक्षेची तारीख अखेर निश्चित झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा मंडळाने केलेली विनंती मान्य केली असून, पीजी नीट परीक्षा ३ ऑगस्ट २०२५ रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा १५ जून रोजी होणार होती, पण परीक्षा मंडळाने परीक्षा घेण्यासाठी वेळ वाढवून मागितला होता. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.के. मिश्रा आणि न्यायमूर्ती ए.जी. मसीह यांच्या खंठपीठाने हा निर्णय दिला. परीक्षेच्या तारखेत बदल करण्यासंदर्भात याचिकाकर्त्यांनी दिलेल्या उत्तराबद्दल आम्ही समाधानी आहेत, असे न्यायालयाने आदेश देताना सांगितले. 

३ ऑगस्ट रोजी होणार नीट पीजी परीक्षा

३० मे रोजी दिलेल्या आदेशानुसार परीक्षा घेण्यासाठी वेळ वाढून देण्यात आला आहे. ३ ऑगस्ट २०२५ रोजी परीक्षा घेण्यासाठी एनबीईला परवानगी देत आहोत. यापुढे वेळ वाढून दिला जाणार नाही, असेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले. 

वाचा >>जपानची ‘जेन झी’ का सोडतेय नोकऱ्या? जपानमध्ये आजवर असं कधीच घडलं नव्हतं

याचिकेवरील सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा घेण्यास होत असलेल्या विलंबाबद्दल चिंता व्यक्त केली होती. तुम्हाला दोन महिने वेळ का हवाय, असा प्रश्नही न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा मंडळाला केला होता. 

राष्ट्रीय परीक्षा मंडळाने न्यायालयाला काय सांगितले?

एनबीईने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, जवळपास २.५ लाख विद्यार्थी आणि ४५० परीक्षा केंद्र आहेत. जर परीक्षा एकाच सत्रात घ्यायची असेल, तर ५०० केंद्राची गरज आहे. त्यामुळे केंद्रांची निवड करणे, सुरक्षेची व्यवस्था करणे आणि विद्यार्थ्यांना केंद्राची निवड करण्यासंदर्भात वेळ लागणार आहे, असे एनबीईने कोर्टात सांगितले होते.        

न्यायमूर्ती पी.के मिश्रा यांनी मंडळाला तुम्हाला ३ ऑगस्ट पर्यंत वेळ हवा आहे. पण, तुम्हाला इतका वेळ का हवा आहे? असा प्रश्न विचारला होता. 

ए.जी. मसीह म्हणाले की, ३० मे रोजी न्यायालयाने आदेश देऊनही तुम्ही अजून प्रक्रिया सुरू केलेली नाही. मग तुम्ही आतापर्यंत काय केलं आहे? विलंब होण्यास हेही कारण आहे. तुम्हाला दोन महिन्यांचा वेळ का हवाय? 

त्यावर एनबीईने तांत्रिक कारणे आणि केंद्राची निवड करण्याचा मुद्दा अधोरेखित केला आणि ३ ऑगस्ट रोजी परीक्षा घेण्यात येईल, असे सांगितले. कोर्टाने त्याला परवानगी दिली. 

टॅग्स :NEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालSupreme Courtसर्वोच्च न्यायालयexamपरीक्षा