शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

नीरव मोदीने फिरविला २०० शेल कंपन्यांतून पैसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 1:58 AM

पंजाब नॅशनल बँकेतील ११,४०० कोटी रुपयांच्या घोटाळ््यातील प्रमुख आरोपी असलेला आघाडीचा हिरे व्यापारी नीरव मोदी, त्याचे कुटुंबिय, धंद्यातील भागिदार मेहुल चोकसी व इतरांशी

नवी दिल्ली/मुंबई: पंजाब नॅशनल बँकेतील ११,४०० कोटी रुपयांच्या घोटाळ््यातील प्रमुख आरोपी असलेला आघाडीचा हिरे व्यापारी नीरव मोदी, त्याचे कुटुंबिय, धंद्यातील भागिदार मेहुल चोकसी व इतरांशी संबंधित किमान २०० शेल कंपन्या व बेनमी मालमत्ता आता तपासी यंत्रणांच्या रडारवर आल्या आहेत.मोदी, चोकसी व त्यांच्या कंपन्यांविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रविवारी लागोपाठ चौथ्या दिवशी धाडसत्र सुरु ठेवले व त्यात देशातील अनेक ठिकाणच्या दागिन्यांच्या शोरूम व कारखान्यांवर छापे टाकण्यात आल्या. सीबीआयने पीएनबीच्या मुंबईतील ब्रॅडीरोड शाखेवरही छापे मारले.‘ईडी’च्या सूत्रांनी सांगितले की, नीरव मोदी व त्याच्या कंपन्याशी संबंधित ज्या २९ मालमत्तांवर प्राप्तिकर विभागाने हंगामी जप्ती आणली आहे त्या मालमत्तांची आम्ही ‘मनी लॉड्रिंग’ कायद्यान्वये आम्ही छाननी करीत असून त्या मालमत्तांवर आम्हीही लवकरच टांच आणू.पीएनबी घोटाळ््यातील पैसा फिरविण्यासाठी ज्यांचा वापर केला गेला अशा सुमारे २०० बनावट व शेल कंपन्यांचाही ‘ईडी’ व प्राप्तिकर विभाग मागोवा घेत आहे. गुन्ह्यातून मिळविलेला पैसा वापरून जमीनमुमला, सोने व हिरे आणि रत्ने या स्वरूपात बेनामी मालमत्ता करण्यास या कंपन्यांचा वापर केला गेला, असा प्राथमिक अंदाज आहे. याचा तपास करण्यासाठी ‘ईडी’ व प्राप्तिकर विभाग या दोघांनीही विशेष पथके स्थापन केली आहेत. ‘ईडी’ने आत्तापर्यंत हिरे, दागिने व अन्य मौल्यवान रत्नांच्या स्वरूपात ५,६७४ कोटी रुपयांच्या मालमत्तांवर टांच आणली आहे. दुसरीकडे प्रप्तिकर विभागाने नीरव मोदी व त्याच्याशी संबंधित २९ मालमत्तांवर जप्ती आणली असून १०५ बँक खाती गोठविली आहेत.सार्वजनिक बँकांचे खासगीकरण करा - असोचेमकेंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवरील नियंत्रणे हटवून त्यांना खाजगी क्षेत्रातील बँकेप्रमाणे काम करु द्यावे, असे असोचेम या उद्योगक्षेत्रातील संघटनेने म्हटले आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे हे बँकांसाठी शाप व वरदान असे दोन्ही ठरत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांतील आपल्या भांडवलाचे प्रमाण सरकारने ५० टक्क्यांपेक्षा कमी केले तर त्या बँकांना अधिक स्वायत्तता मिळेल. तसेच वरिष्ठ व्यवस्थापनाला अधिक विश्वासार्हता व जबाबदारीने काम करता येईल असे असोचेमचे सेक्रेटरी जनरल डी. एस. रावत यांनी एका पत्रकात म्हटले आहे.घोटाळ्यात अन्य बँकांचाही सहभागकोलकाता : पीएनबी घोटाळ्यात अन्य बँकांचाही सहभाग असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.आणखी पाच अधिकाºयांची चौकशीपीएनबी घोटाळ्यात बॅँकेच्या आणखी पाच अधिकाºयांची सीबीआयने चौकशी सुरू केली आहे. चौकशीत असलेल्या अधिकाºयांची संख्या आता ११ झाली आहे. सीबीआय गीतांजली समूहाच्या १८ उपकंपन्यांचे व्यवहारही तपासणार आहे.पंतप्रधान मोदी दोन तासाच्या परीक्षेत कसे उत्तीर्ण व्हावे याचे सल्ले विद्यार्थ्यांना देतात, पण २२ हजार कोटी रुपयांच्या बँक घोटाळ््याविषयी बोलायला त्यांच्याकडे दोन मिनिटांचाही वेळ नाही. जेटली तर लपूनच बसले आहेत. तुम्हीच गुन्हेगार असल्याप्रमाणे वागणे बंद करा आणि तोंड उघडा!-राहुल गांधी, अध्यक्ष,काँग्रेस (टिष्ट्वटरवर)पंजाब नॅशनल बँकेकडून निरव मोदीच्या कंपन्यांना दिली गेलेली ‘लेटर आॅफ अंडरटेकिंग्ज’ (एलओयू) जेथे वटविली गेली त्या इतर भारतीय बँकांच्या हाँगकाँग येथील शाखांमधील अधिकारीही या तपासाच्या घेºयात आल्या आहेत. सलन सात वर्षे सुरु असलेल्या या घोटाळ््यात अलाहाबाद बँक, स्टेट बँक आॅफ इंडिया, युनियन बँक, युको बँक आणि अ‍ॅक्सिस बँकेचेही अधिकारीही गुंतलेले असावेत असे तपासी यंत्रणांना वाटते. यापैकी स्टेट बँकेने २१२ दशलक्ष डॉलर, युनियन बँकेने ३०० दशलक्ष डॉलर, उको बँकेने ४११.८२ दसलक्ष डॉलर तर अलाहाबाद बँकेने दोन हजार कोटी रुपये एवढ्या आपल्याकडील रकमा गोत्यात येण्याचा अंदाज केला आहे.

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा