सामाजिक न्यायाच्या तरतुदीची गरज - यशपाल भिंगे

By Admin | Updated: April 26, 2016 00:16 IST2016-04-26T00:16:35+5:302016-04-26T00:16:35+5:30

नांदेड - वंचित घटकाला प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक न्यायाच्या तरतुदीच्या प्रभावी अंमलबजावणीची आवश्यकता असल्याचे मत डॉ़ यशपाल भिंगे यांनी व्यक्त केले़

The need for social justice provision - Yashpal Bhinge | सामाजिक न्यायाच्या तरतुदीची गरज - यशपाल भिंगे

सामाजिक न्यायाच्या तरतुदीची गरज - यशपाल भिंगे

ंदेड - वंचित घटकाला प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक न्यायाच्या तरतुदीच्या प्रभावी अंमलबजावणीची आवश्यकता असल्याचे मत डॉ़ यशपाल भिंगे यांनी व्यक्त केले़
लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ जिल्हा नांदेडच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती निमित्त रविवारी गांधीनगर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी लसाकमचे विभागीय सचिव निरंजन तपासकर होते़ उपवनसंरक्षक व्ही़ जे़ वरवंटकर, डॉ़ जिरोणेकर, भारत कलवले यांची प्रमुख उपस्थिती होती़ भिंगे म्हणाले, घटनेच्या कलम ४६ ची प्रभावीपणे राज्य सरकारने अंमलबजावणी केल्यास त्यांचा सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय या तिन्ही आघाड्यावर विकास होण्यास मदत होईल़ प्रास्ताविक डॉ़ अशोक झुंजारे यांनी तर सूत्रसंचालन शिवाजी टोप्मे यांनी केले़ यशस्वीतेसाठी मारोती डोणगावकर, डॉ़ के़ पी़ गायकवाड, माधव गोरकवाड, किरण गोईनवाड, जी़ पी़ सोनटक्के, शिवाजी सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले़

Web Title: The need for social justice provision - Yashpal Bhinge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.