शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

मुंबई लोकलसाठी स्वतंत्र कंपनी हवी, जागतिक बँकेची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 11:50 PM

मुंबईच्या उपनगरीय रेल्वेचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र प्रवासी रेल्वे कंपनी स्थापन करण्यात यावी, अशी सूचना जागतिक बँकेने केली आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या काही प्रकल्पांना जागतिक बँकेकडून निधी मिळाला आहे. त्यामुळे बँकेने ही सूचना केली आहे.

नवी दिल्ली/मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वेचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र प्रवासी रेल्वे कंपनी स्थापन करण्यात यावी, अशी सूचना जागतिक बँकेने केली आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या काही प्रकल्पांना जागतिक बँकेकडून निधी मिळाला आहे. त्यामुळे बँकेने ही सूचना केली आहे.जागतिक बँकेचे भारताचे संचालक जुनैद अहमद यांनी येथे एका कार्यक्रमात सांगितले की, मुंबईला अत्यंत कार्यक्षम, टिकाऊ आणि भारताच्या पहिल्या उपनगरी रेल्वे कंपनीची गरज आहे. सध्या उपनगरीय रेल्वेसाठी प्रकल्पनिहाय दृष्टिकोन स्वीकारून व्यवस्थापन केले जाते. त्याऐवजी एक मजबूत सार्वजनिक संस्था निर्माण करण्याची गरज आहे.अहमद यांनी सांगितले की, प्रस्तावित कंपनी सरकारी मालकीची असू शकते, अशा कंपनीचे अनेक फायदे होतील. ही कंपनी अत्यंत कार्यक्षम असेल. बाजारातील संकेतांना ती चटकन प्रतिसाद देईल. ती बाजारातून भांडवल उभी करू शकेल आणि आपल्या कामगारांनाही समभाग देईल, अशी कंपनी स्थापन न झाल्यास बदलत्या तंत्रज्ञानाला प्रतिसाद देणे कठीण होऊन जाईल. हे तंत्रज्ञान संस्थेला हुलकावणी देत राहील. अहमद यांनी सांगितले की, अन्य सार्वजनिक आणि प्रवासी सेवांबाबतही हाच दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज आहे. केवळ प्रकल्प उभे करण्याऐवजी मजबूत संस्था उभ्या करण्यासाठी हालचाली करणे आवश्यक आहे. चांगल्या गुंतवणूक संधी निर्माण करणाऱ्या व्यवस्थेकडून बँक विनियोजनक्षम संस्था निर्माण करणे हे आगामी काळातील आव्हान राहणार आहे. कार्यक्षम संस्था निर्माण करणे येत्या काळात महत्त्वाचे ठरेल.६0 लाख प्रवासीमुंबई उपनगरीय रेल्वेने दररोज ६ दशलक्ष प्रवासी प्रवास करतात. शहरात एकूण चार मार्गांवरून गाड्या धावतात. या सेवेचे व्यवस्थापन मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयामार्फत केले जाते. रेल्वेला मिळणाºया एकूण महसुलात उपनगरीय रेल्वेच्या महसुलाचा मोठा वाटा आहे. जागतिक बँक २00२ पासून मुंबईतील रेल्वे व्यवस्थेशी संबंधित आहे. दोन प्रकल्पांमार्फत प्रशस्त आणि अत्यंत कमी ऊर्जेवर चालणाºया दोन रेल्वे रेक्स प्रकल्पांना जागतिक बँकेने अर्थसाह्य केले आहे.लोकलमुळे ४ हजार कोटींचा तोटामुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवेमुळे (लोकल) गेल्या तीन वर्षांत रेल्वे विभागास ४ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा सहन करावा लागला असल्याची माहिती सरकारने संसदेत दिली आहे. रेल्वे राज्यमंत्री राएन गोहेन यांनी लोकसभेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, २0१४-१७ या काळात उपनगरीय सेवेमुळे रेल्वेला ४,२७९ कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलIndian Railwayभारतीय रेल्वे