शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानाला अटलबिहारी वाजपेयींचे नाव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 11:41 IST

दिल्लीतीत रामलीला मैदानाला भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. 

नवी दिल्ली : दिल्लीतीत ऐतिहासिक रामलीला मैदानाला भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. रामलीला मैदानाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यासाठी उत्तर दिल्ली महानगरपालिकेत प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. महापालिकेच्या चार ते पाच सदस्यांनी हा प्रस्ताव ठेवला असून या प्रस्तावावर येत्या 30 ऑगस्ट रोजी चर्चा होणार आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामलीला मैदानाचे नाव बदलण्यासाठी सुरुवातीला प्रस्ताव संबंधित महानगरपालिकेच्या नेमिंग कमेटीकडे जाईल. या नेमिंग कमेटीमध्ये महापौर आणि विरोधी नेत्यासह सहा सदस्य यावर चर्चा करतील. तसेच, महापालिकेचे आयुक्त प्रस्ताव दाखल करणा-यांना सदस्यांना कारण विचारतील. त्यानंतर आयुक्तांच्या अहवालानंतर नेमिंग कमिटी नाव बदलण्याचा निर्णय घेतील. 

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नुकतेच नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात निधन झाले, भारतामध्ये सर्वपक्षीय नेत्यांबरोबर जगभरातील विविध नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी केलेल्या कार्याला कृतघ्नता व्यक्त करण्यासाठी छत्तीसगडने आपल्या नव्या राजधानीला अटलजींचे नाव देण्याची काल घोषणा केली आहे. या राजधानीचे नाव आता 'अटलनगर' असे करण्यात येणार आहे. 1 ऑक्टोबर रोजी छत्तीसगड निर्मिती दिन साजरा केला जाणार आहे, या दिनाचे औचित्य साधून अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव विविध ठिकाणी देण्यात येणार आहे. यात महाविद्यालय, शाळा, रेल्वे मार्ग, शहर, आदींचा यात समावेश असणार आहे. 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीNew Delhiनवी दिल्ली