शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

एका वर्षानंतर एनडीएला राज्यसभेतही मिळणार बहुमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 13:46 IST

लोकसभेतील प्रचंड विजयानंतर आता भाजपा आणि एनडीएने राज्यसभेकडे लक्ष केंद्रित केले आहे.

नवी दिल्ली - नुकत्याच आटोपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने जबरदस्त विजय मिळवला आहे. केवळ एनडीएच नाही तर भाजपालाही स्वबळावर 303 जागा मिळाल्या आहेत. लोकसभेतील प्रचंड विजयानंतर आता भाजपा आणि एनडीएने राज्यसभेकडे लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या पाच वर्षांत लोकसभेमध्ये बहुमत असले तरी राज्यसभेत बहुमत नसल्याने भाजपाने आणलेली अनेक महत्त्वाची विधेयके रखडली होती. मात्र आता वर्षभरातच राज्यसभेमध्ये बहुमताचा आकडा पार करण्याचे भाजपाचे स्वप्न साकार होण्याची शक्यता आहे. 245 सदस्य संख्या असलेल्या राज्यसभेमध्ये बहुमतासाठी 123 खासदारांची गरज असते. मात्र आजच्या घडीला एनडीएकडे 102 सदस्य आहेत. त्यामुळे एनडीए राज्यसभेतील बहुमतापासून 21 जागांनी दूर आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएकडे 66 खासदार आहेत. तर दोन्ही आघाड्यांपासून दूर असलेल्या पक्षांकडे 66 सदस्य आहेत.  

नोव्हेंबर 2020 पर्यंत 14 राज्यांमध्ये होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकांमधून एनडीए बहुमतासाठी कमी पडत असलेल्या 21 खासदारांची तूट भरून काढेल, असी शक्यता आहे. या निवडणुकीमधून भाजपा आणि मित्रपक्षांना मिळून 16 जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र उर्वरित पाच जागांची भरपाई वायएसआर काँग्रेसच्या पाठिंब्याने करता येऊ शकते. तसेच पुढील वर्षी उत्तर प्रदेशातील 10 जागा रिक्त होणार असून, त्यातील बहुतांश जागा भाजपाच्या खात्यात जाण्याची शक्यता आहे. राज्यसभेमध्ये सध्या एनडीएचे असे आहे पक्षीय बलाबल भाजपा -73अण्णा द्रमुक - 13 जेडीयू - 6 अकाली दल - 3शिवसेना - 3 स्वीकृत - 3 आरपीआय -1 

टॅग्स :BJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाIndiaभारतPoliticsराजकारण