शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

NDA उद्या लोकसभा अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करणार; 26 जून रोजी निवडणूक होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 20:06 IST

सध्या भाजप खासदार भर्त्रहरी मेहताब 18व्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष आहेत.

Lok Sabha : लोकसभा निवडणुकीनंतर आता आजपासून(दि.24) संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यात लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. या नियुक्तीवरुन बराच राजकीय गोंधळ पाहायला मिळतोय. दरम्यान, 26 जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड होणार असून, उद्या, म्हणजेच 25 जून रोजी NDA आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर करेल. मंगळवारी दुपारी 12 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहेत. त्यामुळे त्यापूर्वीच NDA चा उमेदवार जाहीर होईल.

सध्या भाजपचे खासदार भर्त्रहरी मेहताब 18व्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कटक येथील भाजप सदस्य भर्त्रहरी मेहताब यांची घटनेच्या कलम 95(1) नुसार हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. लोकसभेच्या अध्यक्षांच्या निवडीपर्यंत ते लोकसभेच्या पीठासीन अधिकाऱ्याची कर्तव्ये पार पाडतील आणि नवीन लोकसभा अध्यक्षांची निवड करतील.

लोकसभा अध्यक्षपदासाठी बुधवारी निवडणूक होणार अध्यक्षांच्या पॅनेलनंतर प्रो टेम स्पीकर मंत्रिपरिषदेला लोकसभा सदस्य म्हणून शपथ देतील. येत्या दोन दिवसांत सर्व सदस्य वर्णक्रमानुसार शपथ घेतील. लोकसभा अध्यक्षपदासाठी बुधवारी निवडणूक होणार असून त्यानंतर लगेचच पंतप्रधान आपल्या मंत्रिमंडळाचा परिचय करुन देतील. 27 जून रोजी राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शनावरील चर्चेला 28 जूनपासून सुरुवात होणार आहे. 2 किंवा 3 जुलै रोजी पंतप्रधान चर्चेला उत्तर देतील अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :lok sabhaलोकसभाBJPभाजपा