शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

 बिहारमध्ये एनडीए फुटीच्या उंबरठ्यावर? उपेंद्र कुशवाहा भाजपावर नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 15:50 IST

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे भाजपाध्यक्ष अमित शाह एनडीएमधील मित्रपक्षांना सोबत ठेवण्यासाठी सर्वस्व पणाला लावत असतानाचा बिहारमध्ये एनडीएमधील ऐक्याला तडे जाण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

नवी दिल्ली  - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे भाजपाध्यक्ष अमित शाह एनडीएमधील मित्रपक्षांना सोबत ठेवण्यासाठी सर्वस्व पणाला लावत असतानाचा बिहारमध्ये एनडीएमधील ऐक्याला तडे जाण्याचे संकेत मिळू लागले आहेत. गुरुवारी संध्याकाळी पाटणा येथे एनडीएमधील मित्रपक्षांसाठी मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या मेजवानीस केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोक समता पक्षाचे प्रमुख उपेंद्र कुशवाहा हे अनुपस्थित राहणार आहेत. तर संयुक्त जनता दलाकडूनही जागावाटपामध्ये 25 जागांसाठी आग्रह होत असल्याने राज्यात एनडीए फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

सुमारे आठ वर्षांनंतप बिहारमध्ये एनडीएमधील मित्र पक्ष एकत्र येणार आहेत . पाटणा येथील ज्ञान भवनात होणाऱ्या कार्यक्रमामध्ये एनडीएमधील घटक पक्षांचे नेते संबोधित करणार आहेत. मात्र उपेंद्र कुशवाहा यांची अनुपस्थिती या बैकठीमध्ये प्रकर्षाने जाणवणार आहे. तसेच जनता दल युनायटेडचे नेते श्याम रजक यांनी जेडीयू राज्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगत आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात पक्षाला 25 जागा मिळाल्याच पाहिजेत, असा आग्रह धरला आहे. जर एनडीएला नीतिश कुमार यांच्या नेतृत्वाचा लाभ हवा असेल तर त्यांना जेडीयूसोबत न्याय करावा लागेल, असा आग्रह रजक यांना धरला आहे.   पोटनिवडणुकांमध्ये सातत्याने होत असलेल्या पराभवांच्या पार्श्वभूमीवर पराभवाचे कारण जाणून घेण्यासाठी एनडीएची बैठक झाली पाहिजे आणि भाजपाने राज्यातील मित्रपक्षांसोबत बैठक घेऊन जागावाटपाबाबत चर्चा केली पाहिजे., असा सल्ला केंद्रीय मंत्री आणि एनडीएमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकसमाज पक्षाचे नेते उपेंद्र कुशवाहा यांनी दिला होता. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा असून, लोकसभेच्या मागच्या निवडणुकीत भाजपा, लोकजनशक्ती पार्टी आणि राष्ट्रीय लोक समता पार्टीने एकत्र येऊन निवडणूक लढवली होती. मात्र आता संयुक्त जनता दलही एनडीएमध्ये सहभागी झाल्याने बिहारमध्ये जागावाटपाचा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच बिहारमधील एनडीच्या घटक पक्षांकडून जागावाटपाचा आराखडा तयार करण्यासाठी भाजपावर दबाव आणण्यात येत आहे.   

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाBiharबिहार