एनडीएचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचा राजीनामा

By Admin | Updated: June 20, 2017 16:49 IST2017-06-20T16:37:50+5:302017-06-20T16:49:20+5:30

बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांनी आपल्या पदाचा मंगळवारी राजीनामा दिला आहे. राष्ट्रपतीपदासाठी भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही

NDA presidential nominee Ramnath Kovind resigns | एनडीएचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचा राजीनामा

एनडीएचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचा राजीनामा

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.  20 -  बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांनी आपल्या पदाचा मंगळवारी राजीनामा दिला आहे. राष्ट्रपतीपदासाठी भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून रामनाथ कोविंद यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांचा राज्यपालपदाचा राजीनामा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वीकारला आहे. तसेच, पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे बिहारचा अतिरिक्त प्रभार दिला आहे. 
रामनाथ कोविंद यांनी आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली. यावेळी राजनाथ सिंह यांनी त्यांना राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. याबाबत राजनाथ सिंह यांनी ट्विट सुद्धा केले आहे.
रामनाथ कोविंद यांची अचानक राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून घोषणा करून भाजपाने सोमवारी सर्वांनाच धक्का दिला. दलित वर्गात मोडणाऱ्या कोळी समाजाच्या नेत्याला राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्याने, काँग्रेस व अन्य विरोधक काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
बिजू जनता दलाने रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला. तर, राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून रामनाथ कोविंद यांचे नाव जाहीर होणे ही व्यक्तिश: माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. पक्ष म्हणून त्यांना पाठिंबा द्यायचा की नाही, हे मी आताच सांगू शकत नाही. बिहारचे राज्यपाल म्हणून कोविंद यांनी निष्पक्षतेने अनुकरणीय काम केले आहे. त्यांनी राज्य सरकारशी आदर्शवत संबंध ठेवले आहेत, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले आहे.
 
(राष्ट्रपतिपदासाठी भाजपाचे उमेदवार रामनाथ कोविंद)
(कोविंद दलित असले तरी संघवादी)
 

Web Title: NDA presidential nominee Ramnath Kovind resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.