शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

सगळ्यांना सोबत घेऊनच चाला; 'एनडीए'तील आणखी एका मित्रपक्षाचा भाजपाला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2018 18:28 IST

भाजपाने त्यांच्या 'सबका साथ, सबका विकास' या घोषणेचे खऱ्या अर्थाने अनुकरण करण्याची वेळ आली आहे.

पाटणा: आंध्र प्रदेशातील तेलुगू देसम पक्षाने (टीडीपी) राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता आणखी एका मित्रपक्षाने भाजपाला गंभीर इशारा दिला आहे. लोकजनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा रामविलास पासवान यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारमधील पोटनिवडणुकांमधील भाजपाच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर भाष्य करताना म्हटले की, भाजपाने त्यांच्या 'सबका साथ, सबका विकास' या घोषणेचे खऱ्या अर्थाने अनुकरण करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी रालोआने समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पुढे गेले पाहिजे. काँग्रेसने या सर्वसमावेशक राजकारणाच्या बळावरच इतकी दशके भारतात राज्य केले, असे पासवान यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. उत्तर प्रदेशातील गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा मतदारसंघात भाजपाचा झालेला पराभव ही चिंतेची बाब आहे. परंतु, बिहारच्या अररिया मतदारसंघात तस्लिमुद्दीन यांच्याविषयीच्या सहानुभूतीमुळेच 'राजद'चा उमेदवार विजय झाला, असेही पासवान यांनी म्हटले. यावेळी त्यांना चंद्राबाबू नायडू यांच्या 'रालोआ'तून बाहेर पडण्याच्या निर्णयाविषयीही विचारण्यात आले. त्यावर प्रतिक्रिया देताना पासवान यांनी म्हटले की,  आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केंद्राने मान्य केली असती तर हे लोण बिहारपर्यंत पसरले असते. प्रत्येकाला हवे असेल तिथे जाण्याचा हक्क आहे. परंतु, लोकजनशक्ती पक्ष रालोआतच राहील, हे पासवान यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी तेलगू देसम पार्टीतर्फे सातत्याने केली जात होती. मोदी सरकारने ती मान्य न केल्याने त्या पक्षाच्या दोन मंत्र्यांनी आधीच राजीनामा दिला. त्यानंतर आज पक्षाने रालोआतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. लोकसभेतील तेलगू देसमचे नेते नरसिम्हम म्हणाले की, आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असून, त्यासाठी रालोआतून बाहेर पडत असल्याचे टीडीपीने स्पष्ट केले होते. 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस