एनडीए म्हणजे काँग्रेस+ गाय - अरूण शौरींचे टीकास्त्र
By Admin | Updated: October 27, 2015 12:42 IST2015-10-27T10:19:08+5:302015-10-27T12:42:25+5:30
भाजपा सरकारची धोरणे तयार करण्याची पद्धत काँग्रेससारखीच असून त्यात वेगळं काही नाही. केवळ गाईसारखे काही मुद्दे वेगळे असल्याचे सांगत एनडीए म्हणजे काँग्रेस + गाय, अशी टीका भाजपा नेते अरुण शौरींनी केली.

एनडीए म्हणजे काँग्रेस+ गाय - अरूण शौरींचे टीकास्त्र
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - भाजपा सरकारची धोरणे तयार करण्याची पद्धत काँग्रेससारखीच असून त्यात वेगळं काही नाही. केवळ गाईसारखे काही मुद्दे वेगळे असल्याचे सांगत एनडीए म्हणजे काँग्रेस + गाय, अशी टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण शौरींनी केली आहे. एका पुस्तक प्रकाशन समारंभादरम्यान शौरींनी मोदी सरकार दिशाहीन झाल्याचा आरोपही लावला.
ठोस काम करण्याऐवजी फक्त बातम्यांमध्ये झळकत राहण्यावर भर असल्याची टीकाही त्यांनी केली. तसेच मोदींचे पंतप्रधान कार्यालय अतिशय कमकुवत असून तेथे एकही तज्ञ व्यक्ती नाही, असेही ते म्हणाले. मोदी सरकारला देशाची अर्थव्यवस्था सांभाळता येत नाही, आर्थिक सुधारणा करणे म्हणजे फक्त बातम्यांमध्ये झळकत राहणे नव्हे, त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात असेही शौरी यांनी सरकारला सुनावले. सध्या सरकारकडून ठोस काम होताना दिसत नसून आजच्या परिस्थितीत लोकांना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची आठवण येत अाहे, असा घरचा आहेर शौरी यांनी दिला.