राष्ट्रवादी कॉंग्रेसकडुन संघाचा निषेध
By Admin | Updated: January 30, 2015 21:11 IST2015-01-30T21:11:40+5:302015-01-30T21:11:40+5:30
फोटो आहे....

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडुन संघाचा निषेध
फ टो आहे....राष्ट्रवादी कॉंग्रेसकडुन संघाचा निषेधमूक आंदोलन : महात्मा गांधी जिंदाबादच्या घोषणानागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेंचा गोडवा गाणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आज राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून व्हेरायटी चौकात निषेध करण्यात आला. यावेळी शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात तोंडाला काळ्या पट्ट्या लावून मूक आंदोलन केले.महात्मा गांधी यांची ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे याने हत्या केली होती. महात्मा गांधींनी अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेच्या विचारांचे उदात्तीकरण करण्याचा कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष आणि संघटनांनी सुरू केला आहे. याचा विरोध करण्यासाठी शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर एकत्र आले. त्यांनी दीड तास आपल्या तोंडाला काळ्या पट्ट्या लावून मूक आंदोलन केले. यावेळी गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा गोडवा गाणाऱ्या भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जाहीर निषेध असे फलक हातात घेऊन कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. नथुराम गोडसेचे पुतळे उभारून गांधी हत्येचा दिवस शौर्य दिवस म्हणून साजरा करण्याच्या हालचाली काही संघटनांनी सुरू केल्यामुळे हे आंदोलन केल्याचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितले. आंदोलनात माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार प्रकाश गजभिये, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, माजी आमदार दीनानाथ पडोळे, माजी शहराध्यक्ष दिलीप पनकुले, प्रदेश महासचिव शब्बीर अहमद विद्रोही, नगरसेविका प्रगती पाटील, नगरसेवक राजू नागुलवार, महिला शहर अध्यक्ष नुतन रेवतकर, रमेश फुले, अनिल अहिरकर, माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य, प्रवीण कुंटे, कामिल अन्सारी, बंडू उमरकर, विशाल खांडेकर, मोहन खानचंदानी, शैलेंद्र तिवारी, महेंद्र भांगे, अशोक काटले, दिनकर वानखेडे, रिजवान अन्सारी, तनुज चौबे, वर्षा शामकुळे, लोकेश बोबडे, सतीश शिंदे यांच्यासह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मूक आंदोलनानंतर कार्यकर्त्यांनी नथुराम गोडसे मुर्दाबाद, महात्मा गांधी अमर रहे अशा घोषणा देऊन व्हेरायटी चौक दणाणून टाकला. ..................