नागरि सुविधांसाठी राष्ट्रवादीचे उपोषण पालिकेच्या चौकशीची मागणी : प्रलंबित कामे पूर्ण करा
By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:43+5:302015-06-15T21:29:43+5:30
कोपरगाव : सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व जनविकास आघाडीच्या वतीने कोपरगाव पालिकेसमोर सोमवारपासून उपोषण सुरू करण्यात आले़ प्रशासनाच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला़

नागरि सुविधांसाठी राष्ट्रवादीचे उपोषण पालिकेच्या चौकशीची मागणी : प्रलंबित कामे पूर्ण करा
क परगाव : सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व जनविकास आघाडीच्या वतीने कोपरगाव पालिकेसमोर सोमवारपासून उपोषण सुरू करण्यात आले़ प्रशासनाच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला़कोपरगाव शहराला पाणी पुरवठा तीन दिवसाआड करावा, येसगाव येथील साठवण तलाव क्रमांक चारचे चार वर्षापासून बंद असलेले काम तातडीने सुरू करावे, ठेकेदारावर दंडात्मक कारावाई करावी, कोपरगाव शहरातील विस्थापित लोकांना गाळे वाटप करावेत, शहरातील मुख्यरस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करून धुळ मुक्त कोपरगाव करावे, जलतरण तलाव जनतेसाठी खुला करावा, धारणगाव रस्त्याचे प्रलंबीत काम मार्गी लावावे, बांधकाम विभागातील अनागोंदी कारभार थांबवावा, माधव बागेचे सुशोभिकरण करावे, कत्तलखान्याचे काम पुर्ण करावे आदी मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या़ यावेळी आशुतोष काळे, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव संदिप वर्पे, दिपक साळूंके, दत्तोबा जगताप, जनविकास आघाडीचे अध्यक्ष विजय आढाव, मिनल खांबेकर, अशोक खांबेकर, वैशाली आढाव, मायादेवी खरे, शमीमबी कुरेशी, सुनिल गंगुले, दिनार कुदळे, कृष्णा आढाव, मुकूंद इंगळे, नवाज कुरेशी, प्रसाद आढाव, संतोष चवंडके आदी उपस्थित होते़आशुतोष काळे म्हणाले, जनतेला मुलभुत सुविधा मिळाव्यात यासाठी हे उपोषण आहे़ पालिका प्रशासनावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही़ तेव्हा जिल्हाधिकार्यांनी चौकशी करून कामे मार्गी लावावीत़ संदिप वर्पे म्हणाले, मुख्याधिकार्यांनी आमच्या प्रश्नावर दिलेली उत्तरे समर्पक नाहीत, निवडक नगरसेवक, ठेकेदार व मुख्याधिकारी गैरकारभार करीत आहेत़ या कामाची प्रशासकिय यंत्रणेने चौकशी करावी, विजय आढाव यांनी हे उपोषण प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद मिळे पर्यंत सोडले जाणार नाही असे स्पष्ट केले़फोटो- 15062015कोप01 उपोषणकॅप्शन- कोपरगाव शहराच्या विविध प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस व जनविकास आघाडीच्या वतीने पालिकेसमोर उपोषण सुरू करण्यात आले़ (छाया- हेमचंद्र भवर)