राष्ट्रवादीची नगरसेविका बेपत्ता नेरूळमध्ये तक्रार : घटनेमुळे परिसरात खळबळ
By Admin | Updated: September 28, 2015 21:52 IST2015-09-28T21:52:13+5:302015-09-28T21:52:13+5:30
नवी मुंबई : नेरूळ येथील प्रभाग क्रमांक ८८च्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका शशीकला मालादी सहा दिवसांपासून बेपत्ता आहेत. या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. २३ सप्टेंबरला त्या बेपत्ता असून सोमवारी यासंबंधीची तक्रार नेरूळ पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. नगरसेविका शशिकला मालादी गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होत्या. या तणावातच त्या घराबाहेर निघून गेल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यांना असलेल्या तणावाचे कारण कळू शकलेले नाही.(प्रतिनिधी)

राष्ट्रवादीची नगरसेविका बेपत्ता नेरूळमध्ये तक्रार : घटनेमुळे परिसरात खळबळ
न ी मुंबई : नेरूळ येथील प्रभाग क्रमांक ८८च्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका शशीकला मालादी सहा दिवसांपासून बेपत्ता आहेत. या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. २३ सप्टेंबरला त्या बेपत्ता असून सोमवारी यासंबंधीची तक्रार नेरूळ पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. नगरसेविका शशिकला मालादी गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होत्या. या तणावातच त्या घराबाहेर निघून गेल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यांना असलेल्या तणावाचे कारण कळू शकलेले नाही.(प्रतिनिधी)