राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाला ठोकले टाळे!
By Admin | Updated: October 6, 2014 04:44 IST2014-10-06T04:44:39+5:302014-10-06T04:44:39+5:30
मुखेड-कंधार मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामचंद्र पोले यांच्या मुखेड शहरातील प्रचार कार्यालयास कार्यकर्त्यांनीच टाळे ठोकल्याचा प्रकार रविवारी सकाळी ११ वाजता समोर आला़

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाला ठोकले टाळे!
मुखेड (जि़ नांदेड) : मुखेड-कंधार मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामचंद्र पोले यांच्या मुखेड शहरातील प्रचार कार्यालयास कार्यकर्त्यांनीच टाळे ठोकल्याचा प्रकार रविवारी सकाळी ११ वाजता समोर आला़ त्यानंतर काही जणांनी मध्यस्थी केल्याने हे टाळे काढण्यात आले़
मुखेड-नरसी राज्य रस्त्यावर पोले यांचे प्रचार कार्यालय सुरू आहे़ प्रचारासाठी १० ते १५ वाहने बांधण्यात आली़ प्रचारासाठी कार्यकर्त्यांचीही जमवाजमव झाली़ मात्र, चार ते पाच दिवसांपासून गाडीभाडे, डिझेलसाठी पैसे, कार्यकर्त्यांना चहापाणी व इतर खर्चासाठी पैसे मिळाले नसल्याने अनेकांच्या मनात संताप होता़ डिझेल व भाडे दिल्याशिवाय गाड्या काढणार नाही, अशी भूमिका काही कार्यकर्त्यांनी घेतली़ यावेळी काही कार्यकर्त्यांनी पोले यांच्या निवासस्थानी जाऊन पैशांची मागणी केली़ यावेळी उमेदवार व कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली़ यातून आम्हाला अपमानास्पद वागणूक देण्यात आली, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे़ याच कारणावरून कार्यकर्त्यांनी प्रचार कार्यालयास चक्क टाळेच ठोकले़