श्रीवर्धनमधून राष्ट्रवादीच्या अवधूत तटकरेंचा अर्ज
By Admin | Updated: September 26, 2014 23:33 IST2014-09-26T23:33:50+5:302014-09-26T23:33:50+5:30
१९३ श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अवधूत तटकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सादर केला

श्रीवर्धनमधून राष्ट्रवादीच्या अवधूत तटकरेंचा अर्ज
बोर्लीपंचतन : १९३ श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अवधूत तटकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सादर केला. त्याचप्रमाणे श्रीवर्धन विधानसभेसाठी भारतीय जनता पार्टी (भाजप) च्यावतीने पांडुरंग चौले यांनी प्रथमच आपला उमेदवारी अर्ज भरला. तर अपक्ष म्हणून उदय भिवाजी कठे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने श्रीवर्धनमध्ये शक्तिप्रदर्शन करण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
शनिवार हा नामनिर्देशन पत्र भरण्याचा अंतिम दिवस असूनही आतापर्यंत श्रीवर्धनसाठी फक्त ३ उमेदवारांचेच अर्ज दाखल झाले आहेत. शिवसेना पक्षाकडून शनिवारी अर्ज कोण भरते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. तर आघाडी तुटल्यानंतरही काँग्रेसकडून अद्याप उमेदवार कोण याबाबत काहीच समजू शकले नसले तरी माजी आमदार शाम सावंतांच्या नावाची चर्चा सुरु आहे. उद्याच्या नामनिर्देशन भरण्याच्या अंतिम दिवशी सर्व स्पष्ट होवू शकेल. पण अवधूत तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली.
या सभेस जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल, भाई पाशिलकर, बाबुराव भोनकर, शुभदा तटकरे, महमद मेमन, शाम भोकरे, मधुकर पाटील, चंद्रकांत रोडे, कविता सातनाक, स्वाती पाटील, देविदास कावळे, अनंत सावंत तसेच इतरही मान्यवर उपस्थित होते.