प्रभाग रचनेची प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राष्ट्रवादीचा आरोप : न्यायालयात देणार आव्हान
By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:06+5:302015-08-02T22:55:06+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शुक्रवारी जाहीर झालेल्या प्रभाग रचनेला राष्ट्रवादी काँग्रेसने हरकत घेतली आहे. नवीन प्रभाग रचना जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने करण्यात आली असून याला न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रभाग रचनेची प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राष्ट्रवादीचा आरोप : न्यायालयात देणार आव्हान
क ्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शुक्रवारी जाहीर झालेल्या प्रभाग रचनेला राष्ट्रवादी काँग्रेसने हरकत घेतली आहे. नवीन प्रभाग रचना जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने करण्यात आली असून याला न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी पत्रकार परिषदेत दिली.प्रभागांचे सीमांकन होण्यापूर्वीच प्रशासनाने आरक्षण सोडत जाहीर केली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच महापालिका क्षेत्रात २७ गावांचा समावेश झाल्यामुळे तेथील प्रभागांमध्ये वाढ होणे अपेक्षित होते. परंतु, जाणीवपूर्वक या ठिकाणी कमी प्रभाग पाडण्यात आल्याचे ते म्हणाले. प्रभाग रचनेला राष्ट्रवादीचा तीव्र विरोध असून हरकती नोंदवायच्या वेळी हरकती नोंदविल्या जातील, परंतु वेळ पडल्यास न्यायालयात याला आव्हान देण्याची तयारी असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. आघाडी सरकारने कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी १८०० कोटींचा निधी दिला, परंतु सत्ताधार्यांनी शहरांऐवजी स्वत:चाच विकास केल्याची टीका त्यांनी केली. स्मार्ट योजनेतील कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या समावेशामुळे केवळ १५० कोटी मिळणार आहेत. तेव्हा या निधीचा वापर सत्ताधारी कसा करतील, असा टोला त्यांनी लगावला. तळोजापर्यंत येणारी मेट्रो सेवा उल्हासनगर-डोंबिवली-कल्याण-मुरबाडपर्यंत आणावी. ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण नेमावे, अशी मागणी त्यांनी केली. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, माया कटारिया, उमेश बोरगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.