शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

NCP vs BJP: "मोदी सरकार देशात आल्यानंतर बेरोजगारांचा वाईट काळ सुरू झाला"; राष्ट्रवादीचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 19:45 IST

मोदी सरकारच्या काळात रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांच्या आत्महत्या वाढल्याचाही केला दावा

NCP vs BJP: पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्वाखालील सरकार हे भांडवलदारांचे आहे हे आम्ही आधीपासूनच बोलत आहोत. रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांच्या वाढत्या आत्महत्येवरुन तर आता हे स्पष्ट झाले आहे. २०१४ मध्ये मोदी सरकार देशात आल्यानंतर देशात रोजंदारी करणार्‍या व बेरोजगारांसाठी वाईट काळ सुरू झाला, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. काल नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा एक सर्वे प्रसिद्ध झाला असून त्यामध्ये भारतात रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांच्या आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त आहे, असा दावा करण्यात आल्याचे महेश तपासे म्हणाले. त्याचाच आधार घेत तपासे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०१४ साली देशात सरकार आले. तेव्हापासून मोदी सरकार हे भांडवलदारांचे सरकार आहे हे आम्ही आधीपासूनच बोलत होतो. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या सर्वेनुसार रोजंदारी करणार्‍या लोकांच्या आत्महत्येचे प्रमाण सध्या जास्त आहे. हे प्रमाण आता वाढत जात आहे. याचाच अर्थ देशातील सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने काहीच केले नाही", असा आरोपही महेश तपासे यांनी केला.

"नोटाबंदी करुन सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडलेच. पण याशिवाय कोरोना काळात अचानक केलेले लॉकडाऊन यामध्ये अनेकांना बेरोजगार व्हावे लागले आणि नोकर्‍यांना मुकावे लागले. मात्र त्यांना दिलासा देण्याऐवजी मोठ्या भांडवलदारांची कर्जे माफ करून मोदी सरकार भांडवलदारांच्या पाठिशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले", असा थेट आरोप तपासे यांनी केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा