राष्ट्रवादीतर्फे निवडणुकीची तयारी सुरू
By Admin | Updated: March 24, 2015 23:50 IST2015-03-24T23:06:47+5:302015-03-24T23:50:48+5:30
नाशिक : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकांची तयारी सुरू झाली असून, जिल्ात सर्व तालुका आणि नाशिक शहराच्या नजीकच्या परिसरात सहायक निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

राष्ट्रवादीतर्फे निवडणुकीची तयारी सुरू
नाशिक : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकांची तयारी सुरू झाली असून, जिल्ात सर्व तालुका आणि नाशिक शहराच्या नजीकच्या परिसरात सहायक निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
राष्ट्रवादीच्या वतीने २०१५-१७ या कालावधीसाठी नूतन पदाधिकारी निवडण्यात येणार आहेत. नाशिक जिल्ासाठी निवडणूक अधिकारी म्हणून बापू भुजबळ यांची निवड करण्यात आली आहे. आता सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार यांनी दिली. नवनियुक्त सहायक निवडणूक अधिकारी पुढीलप्रमाणे- नाशिक- उत्तम अहेर, सिन्नर तालुका- नितीन मोहिते (शहर- डॉ. योगेश गोसावी), इगतपुरी- खेमराज कोर (शहर- अशोक सावंत), त्र्यंबकेश्वर- धर्मराज खैरनार (शहर- उषाताई बच्छाव), दिंडोरी- नंदकुमार कदम, कळवण तालुका- गोरख बलकवडे, देवळा तालुका- सुनील पाटील, बागलाण तालुका- सोमनाथ खातळे (शहर- जगदीश पवार), मालेगाव- सुनील कबाडे, येवला- विजय पवार (शहर- हरिभाऊ जाधव), चांदवड- किशोर इंगळे, नांदगाव- मायावती पगारे (नांदगाव- राधाकिसन सोनवणे) निफाड- नीलेश पटेल, सुरगाणा- भास्कर भगरे, पेठ- हिरामण खोसकर, शहरनिहाय नियुक्ती पुढीलप्रमाणे- भगूर- अरुण मेढे, देवळाली कॅम्प- उत्तम सहाणे, मनमाड- अनिल काळे.