शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Karnataka Border Dispute: लोकसभेत खडाजंगी! सीमाप्रश्नावरुन सुप्रिया सुळेंनी भर सभागृहात भाजपला चांगलंच सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 16:22 IST

Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस चिघळत असल्याचे दिसून येत आहे. बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. तसेच महाराष्ट्राविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पुण्यातही कर्नाटकच्या बसेस लक्ष्य करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बोम्मई यांच्यातील चर्चेनंतर कर्नाटकाने आपला पवित्रा कायम ठेवला आहे. सीमाप्रश्नाचे पडसाद लोकसभेतही उमटल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सभागृहात बोलताना भाजपवर टीकास्त्र सोडले.

संसदेच्या हिवाळी अधिवेशानाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहेत. तसेच संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही यावरुन खडाजंगीला सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे. लोकसभेमध्ये सुप्रिया सुळे यांनी या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केला. महाराष्ट्र कर्नाटक मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी यावेळी बोलताना केली. 

अमित शाह यांना विनंती आहे की, त्यांनी यावर बोलावे

महाराष्ट्रात गेल्या १० दिवसांपासून एक नवा प्रश्न उभा राहिला आहे. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री काहीही बोलत आहेत. हद्दच झाली. कर्नाटक सीमेवर महाराष्ट्राचे लोक जाणार होते. पण त्यांना मारहाण करण्यात आली. महाराष्ट्राच्या विरोधात षडयंत्र करण्यात आले. दोन्ही राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. तरी कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राविरोधात बोलतात. हे चालणार नाही. हा देश एक आहे. अमित शाह यांना विनंती आहे की, त्यांनी यावर काहीतरी बोलावे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. 

दरम्यान, सुप्रिया सुळेंसह अन्य खासदार आक्रमक होत असताना, कर्नाटकमधील हवेरी मतदारसंघाचे भाजप खासदार शिवकुमार उदासी यांनी महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य केले. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे नेते नेहमीच अशा प्रकारे वर्तन करतात. जेव्हा ते सत्तेतून पायउतार होतात, तेव्हा हे अशा प्रकारे वर्तन करतात, अशा शब्दांत त्यांनी सुप्रिया सुळे आणि इतर विरोधी पक्षाच्या खासदारांना प्रत्युत्तर दिले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :border disputeसीमा वादSupriya Suleसुप्रिया सुळेBJPभाजपाlok sabhaलोकसभाParliamentसंसद