सिंचन घोटाळा राष्ट्रवादीला भोवणार

By Admin | Updated: September 26, 2014 01:56 IST2014-09-26T01:56:34+5:302014-09-26T01:56:34+5:30

राज्यातील आघाडी सरकारमध्ये कोट्यवधी रुपयांचा सिंचन घोटाळा झाला

NCP gets screwed up | सिंचन घोटाळा राष्ट्रवादीला भोवणार

सिंचन घोटाळा राष्ट्रवादीला भोवणार

अलिबाग : राज्यातील आघाडी सरकारमध्ये कोट्यवधी रुपयांचा सिंचन घोटाळा झाला. या प्रकरणात तत्कालीन जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना किमान दोन वर्षे तुरुंगात बसावे लागेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून फसवणूक झाल्याने शिवसेनेत प्रविष्ट होत असलेले रायगड जि.प. सदस्य महेंद्र दळवी यांनी गुरुवारी केला आहे.
अलिबाग तालुक्यातील थळ येथे समर्थकांच्या मेळाव्यात दळवी बोलत होते. शिवसेनेकडून उमेदवारी पक्की झाली असून, शुक्रवारी मातोश्रीवर राष्ट्रवादीचे घड्याळ खाली ठेवून धनुष्यबाण उचलणार असल्याचे दळवी यांनी जाहीर केले. आमदार जयंत पाटील यांच्या शेकापची कम्युनिस्ट वादाची भूमिका आता बदललेली असून त्यांंनी पाश्चात्त्य संस्कृती अंगीकारली असल्याची टीका दळवी यांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: NCP gets screwed up