राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदी पुन्हा डॉ.सतीश पाटील
By Admin | Updated: January 24, 2016 22:20 IST2016-01-24T22:20:22+5:302016-01-24T22:20:22+5:30
(हॅलो ग्रामीणसाठी/हॅलो १वर घेतली आहे)

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदी पुन्हा डॉ.सतीश पाटील
(ह ॅलो ग्रामीणसाठी/हॅलो १वर घेतली आहे)जळगाव-राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी (ग्रामीण) जाहीर झाली असून जिल्हाध्यक्षपदी डॉ.सतीश पाटील यांची फेरनिवड झाली आहे. कार्याध्यक्षपदी विलास भाऊलाल पाटील, खजिनदारपदी नामदेव तुकाराम चौधरी यांची निवड झाली आहे. ७ जणांची उपाध्यक्षपदी निवड झाली असून त्यात उमेश नेमाडे (भुसावळ), पंडित चौधरी (अमळनेर), शशिकांत साळुंखे (चाळीसगाव), संजय पवार (चांदसर ता.धरणगाव), बंगालीसिंग चितोडिया (जामनेर), नितीन तावडे (पाचोरा), दत्तात्रय पवार (जळगाव) यांची निवड झाली आहे. याखेरीज २४ जिल्हा सरचिटणीस, १५ संघटन सचिव, ९ सहसचिव, २५ कार्यकारिणी सदस्य व २० कायम निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे.