शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Rafale Deal: 'ना खाऊंगा ना खाने दूंगा'चं काय झालं? शरद पवारांचा मोदींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 13:34 IST

राफेल डीलवरुन विरोधकांचा आक्रमक पवित्रा

मुंबई: राफेल डीलबद्दलची महत्त्वाची कागदपत्रं संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेल्याची माहिती काल मोदी सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली. यानंतर आता विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. यासोबतच 'ना खाऊंगा ना खाने दूंगा' घोषणेचं काय झालं, असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला. शरद पवारांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राफेल करारावरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं. 'राफेल विमान खरेदी प्रकरणातील सरकारची भूमिका अस्वस्थ करणारी आहे. या संपूर्ण प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सर्व विरोधकांनी केली होती. मात्र सरकारनं चौकशीस नकार दिला,' असं शरद पवार म्हणाले. पंतप्रधान मोदींनी ना खाऊंगा ना खाने दूंगा अशी घोषणा दिली होती. त्या घोषणेचं काय झालं, असा प्रश्न यावेळी पवारांनी विचारला. राफेल डील प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकांवर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी या डील संदर्भातील महत्त्वाची कागदपत्रं चोरीला गेल्याची माहिती महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी दिली. पंतप्रधान कार्यालयानं राफेल डीलमध्ये हस्तक्षेप करुन समांतर वाटाघाटी केल्याचं वृत्त 'द हिंदू' वृत्तपत्रानं काही गोपनीय कागदपत्रांच्या आधारे 'दिलं होतं. ही कागदपत्रं चोरीला गेल्याची माहिती महाधिवक्ते के. के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली. 'द हिंदू'नं ज्या कागदपत्रांच्या आधारे राफेल डीलबद्दलचं वृत्त दिलं, ती कागदपत्रं सादर केल्यास देशाच्या सुरक्षेला धक्का पोहोचेल, असा दावा वेणुगोपाल यांनी केला. यानंतर याचिकाकर्ते आणि वकील प्रशांत भूषण यांनी युक्तिवाद केला. सरकारनं न्यायालयाला चुकीची माहिती दिल्याचा गंभीर आरोप भूषण यांनी केला.   

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीNCPराष्ट्रवादी काँग्रेस